आयपीएलच्या 35व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससमोर सनरायझर्स हैदराबादचं आव्हान होतं. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. हैदराबादनं दिल्लीवर 67 धावांनी विजय मिळवला आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादनं निर्धारित 20 षटकांत 7 बाद 266 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, दिल्लीचा संघ 19.1 षटकांत 199 धावांवर ऑलआऊट झाला.
दिल्लीकडून जेक फ्रेझर-मॅकगर्कनं तुफानी फटकेबाजी केली. त्यानं अवघ्या 18 चेंडूत 65 धावा ठोकल्या. आपल्या या खेळीत त्यानं 5 चौकार आणि 7 षटकार लगावले. अभिषेक पोरेलनं 22 चेंडूत 42 धावा ठोकल्या. त्यानं 7 चौकार आणि 1 षटकार ठोकला. कर्णधार ऋषभ पंत 44 धावा करून बाद झाला. टी नटराजननं 4 षटकांत 19 धावा देत 4 बळी घेतले.
सनरायझर्स हैदराबादची सुरुवात तुफानी झाली. त्यांनी अवघ्या 5 षटकात 100 हून अधिक धावा केल्या. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्यात अवघ्या 6.2 षटकात 131 धावांची भागीदारी झाली. अभिषेकनं 12 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकारांसह 46 धावा केल्या. अभिषेक शर्माला कुलदीप यादवनं बाद केलं.
यानंतर कुलदीपनं त्याच षटकात एडन मार्करमलाही स्वस्तात बाद केलं. नंतर कुलदीपनं 32 चेंडूत 89 धावा करणाऱ्या ट्रॅव्हिस हेडलाही बाद केलं. हेडनं आपल्या झंझावाती खेळीत 11 चौकार आणि 6 षटकार मारले.
ट्रॅव्हिस हेड बाद झाल्यानंतर हैदराबादची धावगती घसरली. मात्र तरीही संघाला मोठी धावसंख्या गाठण्यात यश आलं. हेड आणि अभिषेक बाद झाल्यानंतर नितीश रेड्डी आणि शाहबाज अहमद यांनी उपयुक्त खेळी खेळली. शाहबाज अहमदनं 29 चेंडूंत 2 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 59 धावा केल्या. तर नितीश रेड्डीनं 27 चेंडूत 37 धावांची खेळी केली. नितीशनं आपल्या खेळीत 2 चौकार आणि 2 षटकार मारले. दिल्लीकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स – डेव्हिड वॉर्नर, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, एनरिक नॉर्किया, खलिल अहमद, मुकेश कुमार
इम्पॅक्ट प्लेअर्स – पृथ्वी शॉ, शाई होप, प्रवीण दुबे, रसिक दार सलाम, सुमित कुमार
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन
इम्पॅक्ट प्लेअर्स – उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंग, आकाश महाराज सिंग, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर