दिल्ली कॅपिटल्सचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव मांडीच्या दुखापतीतून सावरत आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनानं खबरदारीचा उपाय म्हणून त्याला आयपीएलमध्ये विश्रांतीचा सल्ला दिलाय. तो दुखापतीतून कधी बरा होईल याबाबत अद्याप काहीही माहिती नाही.
29 वर्षीय डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवला जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव झाला होता. दुखापतीनंतर त्याला चेन्नई विरुद्धच्या पुढील सामन्यात बाहेर बसावं लागलं होतं. त्याच्या अनुपस्थित अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मानं प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन केलंय.
आयपीएलच्या सूत्रांनुसार, कुलदीप यादवला मॅच फिट होण्यासाठी थोडा वेळ लागेल. कुलदीप हा बीसीसीआयचा वार्षिक करारबद्ध खेळाडू आहे. तो आगामी टी 20 विश्वचषकासाठीही दावेदार आहे. अशा परिस्थितीत त्याच्या दुखापत आणि पुनर्वसन व्यवस्थापनात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) क्रीडा विज्ञान आणि वैद्यकीय संघाचा सल्ला महत्त्वाचा ठरेल.
आयपीएल फ्रँचायझींनी NCA ला भारतीय खेळाडूंच्या दुखापती आणि दुखापतींशी संबंधित अपडेट्सची माहिती देणं बंधनकारक आहे. कुलदीप सर्व सामन्यांसाठी संघासोबत प्रवास करतोय. मात्र रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात त्याच्या सहभागाबद्दल शंका आहे.
आयपीएल 2024 मध्ये कुलदीपनं दोन सामन्यांत 7.62 च्या इकॉनॉमीने तीन विकेट घेतल्या आहेत. नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्यानं चमकदार कामगिरी करत 19 बळी घेतले होते.
कुलदीप यादवच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं आयपीएलच्या 75 सामन्यांमध्ये 74 बळी घेतले आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 28.07 आणि इकॉनॉमी 8.11 एवढी राहिली. 14 धावा देऊन 4 बळी ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. कुलदीप यादवनं भारतासाठी 35 टी20 सामन्यांमध्ये 14.1 च्या सरासरीनं 59 बळी घेतले आहेत. या दरम्यान त्याची इकॉनॉमी 6.75 एवढी राहिली. 17 धावा देऊन 5 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सलग तीन पराभवानंतर हार्दिक पांड्या महादेवाच्या चरणी, सोमनाथ मंदिरात केली पूजा