---Advertisement---

सलग तीन पराभवानंतर हार्दिक पांड्या महादेवाच्या चरणी, सोमनाथ मंदिरात केली पूजा

---Advertisement---

मुंबई इंडियन्सच्या टीमला सध्या ग्रहण लागलं आहे. आयपीएल 2024 मध्ये त्यांनी आतापर्यंत 3 सामने खेळले. या तिन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय.

आयपीएलच्या या हंगामासाठी मुंबईनं आपल्या संघात मोठा बदल केला होता. फ्रॅन्चाईजीनं रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवत हार्दिक पांड्याकडे कमान सोपवली. मात्र सध्या तरी या बदलाचा संघाला काहीही फायदा होताना दिसलेला नाही. दुसरीकडे, हार्दिकला त्याच्या या निर्णयावरून मोठ्या टीकेला सामोरं जावे लागलंय. चाहते स्टेडियममध्ये त्याच्याविरुद्ध जोरदार बूइंग करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर हार्दिक शुक्रवारी (5 एप्रिल) सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी पोहोचला.

मुंबई इंडियन्सचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. हा सामना 7 एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यापूर्वी कर्णधार हार्दिक पांड्या सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी पोहोचला. येथे त्यानं भगवान शंकराची प्रार्थना केली. हार्दिकचा मंदिर परिसरातील एक व्हिडिओ समोर आला आहे.

 

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबईला या हंगामात सलग तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. पहिल्या सामन्यात मुंबईचा गुजरात टायटन्सकडून 6 धावांनी पराभव झाला. यानंतर सनरायझर्स हैदराबादनं त्यांना 31 धावांनी पराभूत केलं. हैदराबादविरुद्ध तर मुंबईच्या गोलंदाजांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली होती. हैदराबादनं त्यांच्याविरुद्ध आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या (277) उभारली. यानंतर तिसऱ्या सामन्यात मुंबईचा राजस्थान रॉयल्सकडून घरच्या मैदानावर 6 विकेट्सनं पराभव झाला.

आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्समधून संघात आणलं होतं. हार्दिक याआधी गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वात गुजरातनं आपल्या पहिल्या हंगामात विजेतेपद, तर दुसऱ्या हंगामात उपविजेतेपद पटकावलं होतं. हार्दिक मुंबईमध्ये येताच त्याला कर्णधार बनवण्यात आलं, तर रोहितची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली. टीमच्या या निर्णयावरून रोहितचे चाहते नाराज आहेत. रोहित शर्मा दीर्घकाळ मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. त्यानं आपल्या नेतृत्वात मुंबईला 5 वेळा आयपीएल चॅम्पियन बनवलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

प्रतीक्षा संपली! चाहते ज्याची वाट पाहत होते तो अखेर आला…सूर्यकुमार यादव मुंबईच्या कॅम्पमध्ये दाखल; पाहा VIDEO

संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं तरीही कौतुक नाही…शशांक सिंगच्या अर्धशतकानंतर पंजाबच्या डगआऊटमध्ये होती शांतता!

कोण आहे आशुतोष शर्मा? पठ्ठ्यानं केवळ 11 चेंडूत ठोकलंय अर्धशतक! जाणून घ्या

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---