आयपीएल 2024 मध्ये आजचा 35वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आहे. दिल्ली कॅपिटल्सची टीम चालू हंगामात प्रथमच त्याचं घरचं मैदान असलेल्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळत आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत – आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. विकेट खूपच चांगली दिसते. आम्हाला धावांचा पाठलाग करायला आवडेल. आम्ही एक अधिक फलंदाज खेळवतोय. आम्ही प्रत्येक सामन्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत. टीममध्ये दोन बदल. सुमितच्या ऐवजी ललित आला आहे. इशांतच्या जागी नॉर्किया येतोय.
हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स – आम्ही ज्या प्रकारे फलंदाजी करत आहेत, आम्हाला माहित आहे की इतर संघ आमच्या विरुद्ध तयारीनं उतरतील. तीच बॅटिंग लाइनअप.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स – डेव्हिड वॉर्नर, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, एनरिक नॉर्किया, खलिल अहमद, मुकेश कुमार
इम्पॅक्ट प्लेअर्स – पृथ्वी शॉ, शाई होप, प्रवीण दुबे, रसिक दार सलाम, सुमित कुमार
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन
इम्पॅक्ट प्लेअर्स – उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंग, आकाश महाराज सिंग, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर
आयपीएलच्या या हंगामात दिल्ली कॅपिटल्सनं आतापर्यंत 7 सामने खेळले, ज्यापैकी त्यांनी तीन सामने जिंकले असून चार सामन्यांमध्ये पराभव पाहिला आहे. महत्त्वाचं म्हणजे दिल्लीनं आपले शेवटचे दोन्ही सामने जिंकले आहेत. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सची टीम गुणतालिकेत 6 अंकांसह सहाव्या स्थानावर आहे.
दुसरीकडे, गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर असलेल्या सनरायझर्स हैदराबादनं या हंगामात अनेक विक्रम रचले आहेत. त्यांनी यंदा दोन वेळा स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या (277 आणि 287) उभी केली आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबादच्या नावावर 6 सामन्यांमध्ये 4 विजय आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –