आयपीएल 2024 चा थरार सुरू होण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आयपीएलमध्ये क्रिकेट चाहते महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांसारख्या सुपरस्टार खेळाडूंना खेळताना पाहण्यास उत्सुक आहेत. तसेच काही खेळाडूंना दुखापतही होत आहे, त्यामुळे फ्रँचायझीची डोकेदुखी वाढली आहे.
यामध्ये आता दुखापतीच्या यादीत श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाचे नावही जोडले गेले आहे, त्यामुळे गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या मोठा धक्का बसला आहे. पाथीरानाला डाव्या पायात दुखापत झाली असून बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात तो निवडीसाठी उपलब्ध होणार नाही.
याबरोबरच सहा मार्च रोजी खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात गोलंदाजी करताना त्याला डाव्या पायाला दुखापत झाली. त्या सामन्यात लंकेला 8 विकेटने मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्यामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. पाथिरानाने 3.4 षटके टाकली, ज्यात त्याने 28 धावा देत दोन गडी बाद केले होते. तसेच श्रीलंका क्रिकेटने पुष्टी केली आहे की, मथिशा पाथिराना दुखापतीमुळे तिसऱ्या टी-20 सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, मथिशा पाथिराना तिसऱ्या टी-20 मध्ये निवडीसाठी उपलब्ध होणार नाही, कारण खेळाडूच्या डाव्या पायाला ग्रेड 1 हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात गोलंदाजी करताना पाथिरानाला दुखापत झाली होती.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज संघाला आशा असेल की मथिशा पाथिरानाची दुखापत फारशी गंभीर नसले. आणि तो आगामी आयपीएल हंगामासाठी सुरुवातीपासून उपलब्ध असले. गेल्या हंगामात त्याने 8 च्या इकॉनॉमीसह 12 सामन्यात 19 विकेट घेत CSK च्या विजेतेपद मोहिमेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.