आयपीएल 2024 स्पर्धेचं बिगुल वाजलं असून पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोणाचं पारडं जड असेल याची चर्चा आतापासून सुरु झाली आहे. आरसीबीला अजून एकदाही जेतेपद जिंकता आलं नाही. तर चेन्नईने पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. पण आयपीएलमध्ये कोणत्याही संघाची सर्वाधिक क्रेझ असेल तर ती आरसीबी संघाची आहे. तसेच आरसीबीच्या क्रेझचे आणखी एक उदाहरण सध्या पीएसएल दरम्यान पहायला मिळाले आहे.
याबरोबरच, आयपीएल 2024 22 मार्चपासून सुरू होणार आहे. मात्र सोशल मीडियावर याबाबतचे वातावरण तयार तापायला सुरवात झाली आहे. कारण आरसीबीचे चाहतेही पुन्हा एकदा पूर्ण उत्साहाने त्यांच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी तयार झालेले पहायला मिळत आहेत. परंतु विराटच्या संघाला आजपर्यंत एकही आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नसली तरी या संघाच्या चाहत्यांमध्ये तोच उत्साह आणि तोच जोश पाहायला मिळत असतो. कारण याचे ताजे उदाहरण पीएसएल 2024 चा हंगामावेळी पहायला मिळाले आहे.
पाकिस्तानातमध्ये सुरू असलेल्या पीएसएल सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये आरसीबीचा चाहता पहायला मिळाला आहे. यावेळी पीएसएल सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये चाहते आरसीबीची जर्सी घालून त्यांच्या संघाला सपोर्ट करताना पहायला मिळाले होते. यावरून आरसीबी संघाची क्रेझ केवळ भारतातच नाही तर ज्या देशात खेळाडू आयपीएलही खेळत नाहीत अशा देशातही पाहायला मिळत आहे.
RCB's fans in PSL 2024 in Pakistan.
– The Craze of RCB and King Kohli…!!!! 🔥 pic.twitter.com/EcXGQE5rF6
— Tanuj Singh (@ImTanujSingh) February 25, 2024
पाकिस्तानमधील पीएसएल सामन्यादरम्यान आरसीबीच्या चाहत्यावर कॅमेरा फोकस झाला होता. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच आरसीबीचे चाहते या पोस्टचे खूप कौतुक करत आहेत आणि त्यावर मीम्सही बनवत आहेत. आरसीबीच्या चाहत्याने पाकिस्तानातील संघाची जर्सी घालून आपल्या संघाला पाठिंबा दिल्याच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत.
𝐓𝐇𝐈𝐒 𝐈𝐒 𝐈𝐓 🤩
For every role, we’ve found our match
And we believe they can hit the Purple Patch!
Signed today or retained before,
This is our #𝗖𝗹𝗮𝘀𝘀𝗢𝗳𝟮𝟬𝟮𝟰#PlayBold #BidForBold #IPLAuction #ನಮ್ಮRCB #IPL2024 pic.twitter.com/5bskDt4eGa— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) December 19, 2023
दरम्यान, BCCI ने IPL 2024 चे वेळापत्रक जाहीर केले असून या स्पर्धेतील पहिला सामना 22 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर लीगच्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीची टीम आरसीबी आणि महेंद्रसिंग धोनीची टीम चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने दिसणार आहेत. याबद्दल चाहते या सामन्याची आतुरतेने वाट देखील पाहत आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG : महेंद्रसिंग धोनीचे रांची कसोटी दरम्यान व्हायरल झाले पहिले नियुक्ती पत्र, पाहा फोटो
- WPL 2024 : मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय, गुजरातला 5 विकेट्सने लोळवलं