---Advertisement---

मेगा लिलावात इतकेच खेळाडू कायम ठेवता येतील, संघांना बसला धक्का!

On: शुक्रवार, मे 31, 2024 6:28 PM
ipl auction 2024
---Advertisement---

आयपीएल 2024 ची सांगता झाली, ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स विजयी झाले. त्यानंतर आयपीएल 2025 चा मेगा लिलाव चर्चेत राहिला आहे. नियमांनुसार, प्रत्येक फ्रँचायझी ‘3+1’ रिटेन्शन नियमांतर्गत मेगा लिलावात 4 खेळाडूंना कायम ठेवण्यास सक्षम असेल. ‘3+1 रिटेन्शन नियम’ म्हणजे लिलावात, फ्रँचायझी 3 खेळाडूंना पूर्णपणे राखून ठेवू शकते आणि ‘राईट टू मॅच’ कार्ड अंतर्गत चौथ्या खेळाडूला परत खरेदी करू शकते. पण अलीकडेच एक बातमी समोर आली आहे की बहुतेक फ्रँचायझी पुढील हंगामासाठी 8 खेळाडूंना कायम ठेवू इच्छित आहेत.

आयपीएल 2024 संपताच आता 2025 च्या मेगा ऑक्शनची चर्चा रंगत आहे. 2024 च्या फायनल मध्ये कोलकात नाईट रायजर्सने सनरायजर्स हैदराबाद संघाचा दारुण पराभव करत आयपीएल इतिहासात तिसऱ्यांदा खिताब जिंकला. त्याअधी आयपीएल लिलावात केकेआरने 24.75 कोटी रुपयांत खरेदी केलेल्या मिचेल स्ट्रार्कने संघासाठी पैसा वसूल कामगिरी करुन दाखवली.

आता मात्र 2025 मेगा लिलावाची सर्वत्र चर्चा होत आहे. नियमांनुसार, प्रत्येक फ्रँचायझी ‘3+1′ रिटेन्शन नियमांतर्गत मेगा लिलावात 4 खेळाडूंना कायम ठेवु शकतो. 3+1 रिटेन्शन नियम’ म्हणजे लिलावात, फ्रँचायझी 3 खेळाडूंना पूर्णपणे संघात कायम ठेवू शकते आणि ‘राईट टू मॅच’ कार्ड अंतर्गत चौथ्या खेळाडूला परत खरेदी करू शकते.

पण अलीकडेच एक बातमी समोर आली आहे की, बहुतेक फ्रँचायझी पुढील हंगामासाठी मेगा लिलावपूर्वी 8 खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची ईच्छा आहे.

परंतु मीडिया रिपोर्ट निसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ‘3+1’ नियमाचे पालन करायचे आहे. असे वृत्त समोर येत आहे . मेगा लिलाव आयोजित झाले तर आणि 3+1 हे नियम बंधनकारक केले तर म्हणजे पुढील मोसमात संघांमध्ये मोठे बदल होताना पाहायला मिळेल. या नवा नियम जर आमलात आला तर रोहित शर्मा, विराट कोहली यांसारखे मोठे खेळाडू इतर संघात जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हे ही तितकच खरं आहे.

‘3+1’ खेळाडू राखून ठेवण्याच्या नियमातील एक मोठी समस्या म्हणजे फ्रँचायझी आपल्या स्टार खेळाडूंना कायम ठेवू शकणार नाही. काही संघांचा चाहतावर्ग केवळ ठरावीक खेळाडूंवर आधारित आहे, जसे विराट कोहली फक्त आरसीबीसाठी खेळला आहे. मात्र लिलावामुळे इंडियन प्रीमियर लीगमधील शान कायम आहे. अश्यातच बीसीसीआय आणि संघ मालक काय अंतिम निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

महत्तवाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बहु-फॉरमॅट मालिकेसाठी भारताचा महिला संघ जाहीर

काय सांगता! टी20 विश्वचषक विजेत्याला मिळते एवढी रक्कम, उपविजेता संघही मालामाल
संदीप लामिछानेचा टी20 विश्वचषक स्वप्न भंगले! अमेरिकन दूतावासाने पून्हा नाकारले संदीपचा व्हिसा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---