आयपीएल सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. सर्व संघांनी आपली रणनिती आखली असून आता आयपीएलच्या थराराला सुरूवात होण्याची सर्व वाट पाहत आहेत. बीसीसीआयने वेळापत्रकही जाहीर केलं असून येत्या 22 मार्चला पहिला सामना होणार आहे. त्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) साठी मोठी बातमी समोर आली आहे.
तसेच आयपीएलआधी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. तर या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच सौदीचा हा निर्णय स्टार खेळाडू मॅट हेन्रीने अतिशय योग्य ठरविला होता. तर त्याने स्टीव्ह स्मिथ आणि उस्मान ख्वाजा यांसारख्या दिग्गजांसह 4 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. पण ऑस्ट्रेलियासाठी कॅमेरॉन ग्रीन हा कठीण परिस्थितीत संघाचा तारणहार ठरला आहे.
याबरोबरच या कसोटी सामन्यात एका बाजुने वारंवार विकेट पडत होत्या. तर दुसऱ्या बाजुला कॅमेरॉन ग्रीन न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करत होता. त्यामुळे त्याने दुसरे कसोटी शतक झळकावून ऑस्ट्रेलियाची लाज वाचवली आहे. तसेच कॅमेरॉन ग्रीनच्या शतकामुळे कांगारू संघ 300 धावांच्या जवळ पोहोचला आहे. तसेच आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी, मुंबई इंडियन्सने त्यांची पर्स वाढवण्यासाठी कॅमेरॉन ग्रीनला आरसीबीला दिले होते. तर गेल्या वर्षी लिलावात मुंबई इंडियन्सने ग्रीनवर 17.5 कोटी रुपये खर्च केले होते. पण आयपीएल 2023 मध्ये ग्रीन अपेक्षेप्रमाणे खेळू शकला नव्हता, मात्र आता ग्रीनला यंदा आरसीबीचे नशीब सुधारण्यात यश मिळते की नाही हे पाहावे लागणार आहे.
दरम्यान, आयपीएल 2024 मधील पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक आज गुरुवारी जाहीर करण्यात आले आहे. तर स्पर्धेतील पहिली मॅच 22 मार्च रोजी गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात चेन्नईत होणार आहे. तसेच बीसीसीआयने स्पर्धेच्या पहिल्या 17 दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले असून यात 4 दिवस डबल हेडरच्या लढतीदिवशी पहिली मॅच दुपारी 3.30 वाजता तर दुसरी मॅच रात्री 7.30 वाजता होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
- IPL 2024 : आयपीएलपूर्वी लखनऊ सुपर जायंट्सने केली मोठी घोषणा, कृणाल पांड्याऐवजी ‘या’ धाकड फलंदाजाला केले उपकर्णधार
- IND vs ENG 5th Test : पाचव्या कसोटीसाठी बीसीसीआयने संघात केला बदल, राहुल आऊट तर बुमराह…