आयपीएल 2024 मध्ये पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले असून या स्पर्धेतील पहिली मॅच 22 मार्च रोजी गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात चेन्नईमध्ये होणार आहे. तसेच बीसीसीआयने स्पर्धेच्या पहिल्या 17 दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले असून यात 4 दिवस डबल हेडरच्या लढती असतील. तर डबल हेडरच्या दिवशी पहिली मॅच दुपारी 3.30 वाजता तर दुसरी मॅच रात्री 7.30 वाजता होणार आहे.
याबरोबरच आयपीएलच्या 2024 च्या आधी लखनऊ सुपर जायंट्स संघाने एक मोठी घोषणा केली आहे. या हंगामासाठी संघाने आपल्या उपकर्णधार बदलला आहे. तसेच गेल्या हंगामात कृणाल पांड्या संघाचा उपकर्णधार होता. मात्र आता निकोलस पूरनला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. याबाबत फ्रेंचायझीने गुरुवारी आपल्या ट्टिटर हँडलवर ही माहिती शेअर केली आहे. यामध्ये संघाचा कर्णधार केएल राहुल निकोलस पूरनला जर्सी देताना दिसत आहे. या जर्सीच्या मागील बाजूस त्यांचे नाव लिहिलेले आहे आणि ब्रॅकेटमध्ये VC लिहिले आहे. म्हणजेच आगामी हंगामात पुरण संघाचा उपकर्णधार असणार आहे.
अशातच सोशल मीडियावर अनेकांनी क्रुणाल पांड्याला का काढून टाकले, असे प्रश्न विचारले आहेत. गेल्या हंगामात त्याच्या नेतृत्वाखाली संघ प्लेऑफमध्ये नक्कीच पोहचला होता. तसेच कर्णधारपद मिळाल्यानंतर त्याने फलंदाज आणि गोलंदाज म्हणून चांगली कामगिरी केली नाही. मात्र सोशल मीडियावरील लोकांना कृणालला का काढण्यात आले यावर विश्वास बसत नाही. तर राहुलशिवाय पांड्याने संघाला अधिक चांगल्या पद्धतीने हाताळले होते, असे अनेकांनी सांगितले आहे.
KL Rahul (C)
Nicholas Pooran (VC)This season feels special already 💙 pic.twitter.com/367JTTeSHL
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) February 29, 2024
दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आयपीएलपूर्वी पुन्हा जखमी झाला आहे. त्यामुळे त्याच्या खेळावर सस्पेन्स निर्माण झाला आहे. याआधी गेल्या वर्षीही त्याला कंबरेच्या दुखापतीने त्रासले होते. त्यामुळे तो संपूर्ण हंगामासाठी बाहेर गेला होता. त्यानंतर त्याने आशिया कपमध्ये पुनरागमन केल्यानंतर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही तो टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग होता. तसेच राहुल तंदुरुस्त नसल्यास अनुभवी कर्णधार निकोलस पुरन आयपीएल 2024 मध्ये संघाची कमान सांभाळताना दिसू शकतो.
आयपीएल 2024 साठी लखनऊ सुपर जायंट्सचा संघ पुढीलप्रमाणे – केएल राहुल (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक, आयुष बडोनी, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, काइल मेयर्स, देवदत्त पडिककल, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, क्रुणाल पंड्या, युधवीर सिंग, यश ठाकूर. , प्रेरक मंकड, अमित मिश्रा, मयंक यादव, शामर जोसेफ, मोहसीन खान, कृष्णप्पा गौतम, अर्शीन कुलकर्णी, शिवम मावी, एम सिद्धार्थ, डेव्हिड विली, ॲश्टन टर्नर, मोहम्मद अर्शद खान.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG 5th Test : पाचव्या कसोटीसाठी बीसीसीआयने संघात केला बदल, राहुल आऊट तर बुमराह…
- हार्दिक पांड्यामुळे इरफान पठानने BCCIला दिला मोठा सल्ला; म्हणाला, ‘हार्दिकसारखे क्रिकेटपटू…