आयपीएल 2024साठी रविवारी (26 नोव्हेंबर) सर्व संघांनी आपल्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. मागच्या काही दिवसांपासून खेळाडूंना रिलीज करण्याबाबत वेगवेगळ्या चर्चा केल्या जात होत्या. रविवारी अखेर सर्वांना सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. मुंबई इंडिन्सच्या चाहत्यांना पुन्हा एकदा हार्दिक पंड्या आपल्या विरोधात खेळताना दिसणार आहे.
होय, मागच्या काही दिवसांपासून हार्दिक पंड्या पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघासाठी खेळणार, अशा चर्चा सुरू होत्या. पण रविवारी (26 नोव्हेंबर) गुजरात टायटन्स संघाने रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी समोर आल्यानंतर, या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. हार्दिक पंड्या आयपीएल 2024 मध्येही गुजरात टायटन्ससाठी खेळणार आणि नेतृत्व करणार आहे.
गुजरात टायटन्सने रिटेन केलेले खेळाडू:
डेव्हिड मिलर, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, हार्दिक पंड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, बी साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, आर साई किशोर, राशिद खान, जोश लिटल, मोहित शर्मा
गुजरात टायटन्सने रिलीज केलेले खेळाडू:
यश दयाल, केएस भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, दासून शनाका.
(IPL 2024 Hardik pandya is retained by Gujarat Titans.)
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024 मध्ये दिसणार गंभीरची KKR! ही आहे रिटेन खेळाडूंची यादी, शार्दुल रिलीज
Mohammad Shami । वेगवान गोलंदाजाच्या गाडीसमोर भीषण अपघात! घाटातील रस्त्यावर काय घडले पाहाच