आयपीएल 2024च्या या हंगामात प्ले-ऑफच्या शेवटच्या टप्प्यात उर्वरित 3 सामने बाकी आहेत. बुधवार (22 मे) रोजी एलिमिनेटर सामन्यासाठी राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) आमने-सामने असणार आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते.
राजस्थान राॅयल्ससाठी या हंगामातील पहिला टप्पा खूप दमदार राहिला. परंतु दुसऱ्या टप्प्यात राजस्थान संघ काहीशी खास कामगिरी करु शकला नाही. राजस्थाननं शेवटच्या 5 सामन्यात 4 सामने गमावले आहेत. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला.
आरसीबीनं या हंगामात पहिल्या टप्प्यात सलग 6 सामने गमावले होते. त्यांच्या प्ले-ऑफमध्ये पोहचण्याच्या आशा संपुष्टात आल्या होत्या. मात्र दुसऱ्या टप्प्यात विराटच्या संघान दमदार कामगिरी करत सलग 6 सामन्यांमध्ये विजय मिळवून क्वालिफाय केले. आयपीएलच्या इतिहासात सलग 6 सामने गमावल्यानंतर क्वालिफाय करणारा आरसीबी पहिलाच संघ ठरला. आरसीबीला प्ले-ऑफमध्ये पोहचवण्यासाठी विराट कोहलीनं 14 सामन्यांमध्ये सर्वाधिक 708 धावा करत खूप मोलाचं योगदान दिलं आहे.
आयपीएलच्या इतिहासात हेड-टू-हेड रेकॉर्ड बघितले तर, आतापर्यंत बंगळुरु आणि राजस्थान 31 वेळा आमने- सामने आले आहेत. त्यामध्ये 15 सामने बंगळुरुनं जिंकले आहेत. तर राजस्थाननं 13 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. आयपीएलच्या इतिहासात प्ले-ऑफमध्ये आरसीबी 9 तर राजस्थानं 6 वेळा क्वालिफाय केलं आहे. आजच्या सामन्यात जो संघ बाजी मारेल तो क्वालिफायर 2 साठी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध भिडणार आहे. ज्या संघाचा पराभव होइल त्या संघासाठी अंतिस फेरीत पोहचण्याचे दरवाजे बंद होतील. क्वालिफायर 2 मध्ये हैदराबादविरुद्ध कोण भिडणार याकडेदेखील सर्वांचे लक्ष्य वेधले आहे.
या सामन्यात जर पावसाने गोंधळ घातला तर पंचांवरती 5-5 ओव्हरचा सामना खेळवण्याची जबाबदारी असेल. तेही शक्य होत नसेल, तर सामना सुपर ओव्हरमध्ये खेळवला जाऊ शकतो. जर पावसाने जास्तच व्यत्यय आणला तर हा सामना गुणतालिकेवर निश्चित केला जाऊ शकतो. याआधारे राजस्थान क्वालिफायर 2 मध्ये पोहचू शकतो.
अशा असू शकतात दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
राॅयस चॅलेंजर्स बंगळुरु- फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमरन ग्रीन, दिनेश कार्तिक, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, यश दयाल, लॉकी फर्ग्यूसन, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज.
राजस्थान राॅयल्स- संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, ध्रुव जुरेल, राॅवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युझवेंद्र चहल.
महत्वाच्या बातम्या-
एलिमिनेटर सामन्यापूर्वी विजय माल्ल्यांचं आरसीबीसाठी खास ट्वीट, विराट कोहलीचं नाव घेऊन म्हणाले…
केवळ 29 धावा करताच विराट कोहली रचणार इतिहास! आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा बनेल पहिलाच फलंदाज