आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने 17 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यंदाचं वर्ष हे निवडणुकीचं आहे. त्यामुळे यंदा आयपीएल स्पर्धा ही टप्प्यात पार पडणार आहे. त्यानुसार बीसीसीआयने आयपीएलच्या 17 व्या मोसमासाठी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर केलं आहे. बीसीसीआयने 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान पहिला टप्पा पार पडणार आहे. तर पहिल्या टप्प्यात एकूण 17 दिवसांमध्ये 21 सामने पार पडणार आहेत.
याबरोबरच यंदाच्या 17 व्या मोसमातील सलामीचा सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. अर्थात हा सामना महेंद्रसिंह धोनी विरुद्ध विराट कोहली असा होईल. हा सामना 22 मार्च रोजी पार पडेल. पहिला सामना हा चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये पार पडणार आहे. तर या पहिल्या टप्प्यातील अखेरचा सामना हा 7 एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे.
तसेच आयपीएलच्या इतिहासात 2008 ते 2023 पर्यंत एकूण 16 हंगाम खेळले गेले आहेत. या 15-16 वर्षांत या लीगमध्ये अनेक मोठे विक्रम झाले आहेत. यातील अनेक विक्रम अजुनही तसेच आहेत. मात्र, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि कधीही काहीतरी घडू शकते. पण या लीगच्या इतिहासात असे काही विक्रम झाले आहेत जे कदाचित मोडले जातील. यापैकी दोन विक्रमांमध्ये द युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा समावेश आहे. तर दुसरा विराट कोहली आणि एमएस धोनीच्या नावावर आहे.
घ्या जाणून आयपीएलच्या इतिहासातील 5 रेकॉर्ड जे अजुनही तसेच आहेत
1- एका डावात सर्वाधिक धावा करणारा संघ
आयपीएलच्या इतिहासात 2013 मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर पुणे वॉरियर्सविरुद्ध 263 धावा केल्या होत्या. तसेच आजपर्यंतच्या कोणत्याही आयपीएल सामन्यातील एका डावातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. विशेष म्हणजे आयपीएलमध्येही आरसीबीची सर्वात कमी धावसंख्या आहे. आरसीबी एका सामन्यात 49 धावा करून ऑलआऊट देखील झाला आहे.
2- एका डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
आयपीएल 2013 मध्ये ज्या सामन्यात आरसीबीने 263 धावा करण्याचा विश्वविक्रम केला होता. याच सामन्यात आरसीबीचा माजी फलंदाज ख्रिस गेलने 175 धावांची उत्कृष्ट खेळी केली होती.
3- आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज
आत्तापर्यंत आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. तर या लीगमध्ये त्याने आतापर्यंत 357 षटकार मारले आहेत. तसेच दुसऱ्या स्थानावर रोहित शर्मा आहे ज्याने या लीगमध्ये 257 षटकार ठोकले आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या एबी डिव्हिलियर्सने 251 षटकार ठोकले होते. आयपीएलमध्ये एमएस धोनीने 239 षटकार तर विराट कोहलीने 234 षटकार मारले आहेत. अशा स्थितीत गेलचा विक्रम अजुनही कायम आहे.
4- आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा
आयपीएलमध्ये विराट कोहलीने 2016 मध्ये चांगली कामगिरी केली होती. या संपूर्ण मोसमात त्याने चार शतके देखील केली होती. यासह त्याच्या नावावर या मोसमात सर्वाधिक 973 धावा केल्या होत्या. आयपीएलच्या एका मोसमातील खेळाडूने आतापर्यंत केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच हा विक्रम अजून मोडलेला नाही.
5- आयपीएलच्या इतिहासात जास्त सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवलेले खेळाडू
आयपीएलच्या इतिहासातील पाचवा अखंड विक्रम हा सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधारपदाचा विक्रम आहे. या बाबतीत महान एमएस धोनी अव्वल आहे. धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 226 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. आगामी हंगामातही तो कर्णधारपदासाठी सज्ज आहे. तर दुसऱ्या स्थानावर रोहित शर्मा आहे ज्याने 158 सामन्यात मुंबईचे कर्णधारपद भूषवले आहे. विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे, तोही आता आरसीबीचा कर्णधार नाही. अशा स्थितीत धोनीचा हा विक्रम आयपीएलच्या अतूट विक्रमांपैकी एक आहे.
महत्वाच्या बातम्या –