---Advertisement---

केकेआरची फायनलमध्ये धडक, पॅट कमिन्सच्या संघाचा दारुण पराभव

On: मंगळवार, मे 21, 2024 11:20 PM
---Advertisement---

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्सने शानदार कामगिरीसह इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आयपीएलच्या इतिहासातील केकेआर संघाचा हा चौथा अंतिम सामना असेल.

केकेआरने मंगळवारी (21 मे) आयपीएल 2024 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादचा 8 विकेटने पराभव केला. या पराभवानंतरही हैदराबाद संघाला आणखी एक संधी मिळणार असून त्यांना क्वालिफायर-2 खेळावे लागणार आहे.

या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 160 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात केकेआरने 13.4 षटकांत 2 गडी गमावून सामना जिंकला. केकेआरसाठी कर्णधार श्रेयस अय्यरने 24 चेंडूत 58 धावांची नाबाद खेळी केली. तर व्यंकटेश अय्यरने २८ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 44 चेंडूत 97 धावांची नाबाद भागीदारी झाली. हैदराबादकडून पॅट कमिन्स आणि टी नटराजन यांनी 1-1 विकेट घेतली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबाद संघाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने केवळ 39 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. यानंतर राहुल त्रिपाठीने 35 चेंडूत 55 धावा आणि हेनरिक क्लासेनने 21 चेंडूत 32 धावा करत संघाला 159 धावांपर्यंत पोहोचवले.

त्रिपाठी आणि क्लासेन यांनी पाचव्या विकेटसाठी 37 चेंडूत 62 धावांची भागीदारी केली. अखेरीस पॅट कमिन्सने 30 धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला 20 चा आकडा गाठता आला नाही. केकेआरसाठी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 बळी घेतले. वरुण चक्रवर्तीने २ बळी घेतले. वैभव अरोरा, सुनील नरेन, आंद्रे रसेल आणि हर्षित राणा यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.

दोन्ही संघांच्या प्लेइंग 11 

सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन

इम्पॅक्ट प्लेअर्स – सनवीर सिंग, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, जयदेव उनाडकट

कोलकाता नाईट रायडर्स – रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

इम्पॅक्ट प्लेअर्स – अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत, शेरफाईन रदरफोर्ड

महत्त्वाच्या बातम्या – 

केकेआरचे 24.75 कोटी रुपये वसूल! मिचेल स्टार्कनं प्लेऑफमध्ये दाखवला त्याचा वर्ल्डकपमधील फॉर्म

टी20 विश्वचषकापूर्वी अफगाणिस्तानचा मोठा निर्णय, ‘या’ दिग्गज खेळाडूची गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती

आयपीएल 2025 च्या लिलावापूर्वी चेन्नई ‘या’ 4 खेळाडूंना रिटेन करू शकते, धोनीचं काय होणार?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---