आयपीएल 2024 च्या 47व्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने आहेत. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत – आम्ही प्रथम फलंदाजी करू. आमचा संघ ज्या प्रकारे सज्ज झाला आहे, ते पाहता आम्ही 2 अंक मिळवण्याचा प्रयत्न करू. विकेट किंचित संथ दिसते. शॉ परत येतो आहे. कुशाग्र बाहेर गेला. मुकेशच्या जागी रसिक दार येतोय.
कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर – आम्ही प्रथम गोलंदाजीच करणार होतो. आम्ही गोष्टी शक्य तितक्या सोप्या ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. जेव्हा तुम्ही 260 स्कोअर करून गेम गमावता, त्यानंतर सर्वांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतोय. स्टार्क आणि वैभव अरोरा संघात परतले आहेत.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, लिझाद विल्यम्स, खलील अहमद
इम्पॅक्ट प्लेअर्स – मुकेश कुमार, प्रवीण दुबे, रिकी भुई, सुमित कुमार, कुमार कुशाग्रा
कोलकाता नाईट रायडर्स – फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंह, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
इम्पॅक्ट प्लेअर्स – अंगकृष्ण रघुवंशी, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज
चालू हंगामात कोलकाता आणि दिल्ली दुसऱ्यांदा एकमेकांसमोर येणार आहेत. ३ एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात केकेआरनं दिल्लीचा 106 धावांनी पराभव केला होता. अशा स्थितीत दिल्लीचा संघ आज गेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी आतुर असेल. रिषभ पंतच्या ब्रिगेडचं लक्ष विजयाची हॅट्ट्रिक करण्याकडे आहे. दिल्ली कॅपिटल्सनं त्यांच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला होता.
दुसरीकडे, शेवटच्या सामन्यात 261 धावा करूनही कोलकाताचा पंजाब किंग्जकडून 8 विकेट्सनं पराभव झाला. टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा धावांचा पाठलाग होता. आजच्या सामन्यात केकेआरचे गोलंदाज आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतील. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघानं आतापर्यंत आठपैकी पाच सामने जिंकले असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दिल्लीनं 10 पैकी पाच सामने जिंकले असून ते सहाव्या स्थानावर आहेत.
हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, दोन्ही संघ एकूण 33 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यापैकी कोलकातानं 17 तर दिल्लीनं 15 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला.
महत्त्वाच्या बातम्या –
ऋतुराज गायकवाडची दुखापत चेन्नईचं संकट वाढवणार? आयपीएल 2024 मधून बाहेर होणार का सीएसकेचा कर्णधार?
3 असे खेळाडू ज्यांचा प्रथमच टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश होऊ शकतो
टी20 वर्ल्डकपसाठी संजू सॅमसनला पहिली पसंती, पंत-राहुलला मिळणार डच्चू?