आयपीएल 2024 मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात ईडन गार्डन मैदानावर सामना खेळला जात आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. मैदानावर बराच वेळ पाऊस पडत होता, त्यामुळे नाणेफेकीला उशीर झाला. आता हा सामना 16-16 षटकांचा असेल.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स – ईशान किशन (यष्टिरक्षक), नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहाल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा
इम्पॅक्ट प्लेअर्स – रोहित शर्मा, शम्स मुलानी, शिवालिक शर्मा, मोहम्मद नबी, कुमार कार्तिकेय
कोलकाता नाईट रायडर्स – फिलि सॉल्ट (यष्टिरक्षक), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंह, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
इम्पॅक्ट प्लेअर्स – अनुकुल रॉय, वैभव अरोरा, सुयश शर्मा, रहमानउल्ला गुरबाज, अंगक्रिश रघुवंशी
कोलकाता नाईट रायर्डस आतापर्यंत 12 सामन्यांमध्ये 8 विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्यांचे 16 गुण आहेत. हा सामना जिंकून केकेआर विजयी लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सनं या हंगामात काही विशेष कामगिरी केलेली नाही. संघ 12 सामन्यांमध्ये 4 विजयांसह गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. मुंबई आधीच प्लेऑफच्या रेस मधून बाहेर पडली आहे.
दोन्ही संघांचा इतिहास पाहता, मुंबई आणि कोलकाता यांच्यात आतापर्यंत एकूण 33 सामने खेळले गेले, यापैकी मुंबईनं 23 सामन्यात विजय मिळवला असून केकेआर 10 सामने जिंकला आहे. शेवटच्या सामन्यात केकेआरनं मुंबईवर 24 धावांनी विजय मिळवला होता. हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळला गेला होता. या सामन्यात केकेआरनं दिलेल्या 170 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची टीम 145 धावांवर सर्वबाद झाली होती. केकेआरसाठी सामनावीर व्यंकटेश अय्यरनं 70 धावांची महत्वपूर्ण खेळी खेळली होती.
मुंबई इंडियन्ससाठी सलामीवीर राेहित शर्मा आणि ईशान किशन यांचा फाॅर्म चिंतेचा विषय आहे. पण मुंबई आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली असल्यानं आज हे दोघंही कोणत्याही दडपणाशिवाय खेळतील का? हे पाहणं गरजेचे आहे. केकेआरकडून सलामीवीर सुनील नारायण आणि फिल साल्ट तुफानी फाॅर्ममध्ये आहेत. या हंगामात नारायणने 11 सामन्यांमध्ये 461 धावा काढल्या आहेत.
केकेआरनं मागील 5 पैकी 4 सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचं पारडं जड आहे, असं म्हणता येईल.
महत्त्वाच्या बातम्या –