---Advertisement---

अंतिम सामन्यात पॅट कमिन्सनं जिंकला टॉस, प्रथम फलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

On: रविवार, मे 26, 2024 7:08 PM
---Advertisement---

आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात आज (26 मे) कोलकाता नाईट रायडर्ससमोर सनरायझर्स हैदराबादचं आव्हान आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11 

सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन

इम्पॅक्ट प्लेअर्स – उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर

कोलकाता नाईट रायडर्स – रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

इम्पॅक्ट प्लेअर्स – अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत, शेरफाईन रदरफोर्ड

केकेआरची टीम चौथ्यांदा आयपीएल फायनल खेळत आहे. तर सनरायझर्स हैदराबादचा संघ तिसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआरनं दमदार कामगिरी केली आहे. केकेआरचा संघ केवळ गुणतालिकेतच अव्वल स्थानी राहिला नाही, तर त्यांनी पहिला क्वालिफायर सामना जिंकून थेट फायनलमध्ये प्रवेश केला. कोलकातानं आतापर्यंत दोन ट्रॉफी जिंकल्या आहेत. संघानं गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली 2012 आणि 2014 मध्ये विजेतेपद पटकावलं होतं. गंभीर आता केकेआरचा मेंटॉर आहे आणि तो फ्रँचायझीचा 10 वर्षांपासूनचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवू पाहणार आहे.

दुसरीकडे, पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादनं क्वालिफायर 2 जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला. पहिल्या क्वालिफायरमध्ये त्यांना केकेआरकडून पराभव स्वीकारावा लागला होता. सनरायझर्सनं 2016 मध्ये एकमेव ट्रॉफी जिंकली होती. डेव्हिड वॉर्नर त्यावेळी संघाचा कर्णधार होता.

कोलकाता विरुद्ध हैदराबाद हेड-टू-हेड बद्दल बोलायचं झालं तर, दोन संघ एकूण 27 वेळा सामनेसामने आले, ज्यापैकी कोलकातानं 18 आणि हैदराबादनं 9 सामने जिंकले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

स्टार्क समोर येताच फुस्स होतो ट्रॅव्हिस हेड, केकेआरविरुद्ध दिसतो नटराजनचा जलवा! KKR vs SRH सामन्याची मनोरंजक आकडेवारी

कोलकाता नाईट रायडर्सला पुन्हा एकदा ट्रॉफी मिळवून देणार का गाैतम गंभीरचा ‘हा’ गेम प्लॅन?

आयपीएल फायनलमध्ये भारतीय खेळाडूंचंच वर्चस्व! आतापर्यंत इतक्या सामन्यांत जिंकलाय सामनावीराचा पुरस्कार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---