आयपीएल 2024 चा 11 वा सामना आज (30 मार्च) लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. हा सामना लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर होतोय. लखनऊ सुपर जायंट्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. लखनऊचा नियमित कर्णधार केएल राहुल दुखापतीनं ग्रस्त आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात राहुलच्या जागी निकोलस पूरन लखनऊचं नेतृत्व करतोय.
निकोलस पूरन – आम्ही प्रथम फलंदाजी करू. हा एक चांगला ट्रॅक दिसत आहे. स्कोरबोर्डवर धावा महत्त्वपूर्ण राहतील. केएल राहुलला दुखापत झाली आहे. त्यामुळे आम्ही त्याला विश्रांती देण्याचा विचार करत आहोत. प्रत्येकानं त्याला मिळालेली संधी साधली पाहिजे आणि सर्वोत्तम कामगिरी केली पाहिजे.
शिखर धवन – आम्ही प्रथम गोलंदाजी केली असती. काल रात्री जेव्हा आम्ही मैदानावर आलो तेव्हा बरंच दव पडलं होतं. फलंदाजी करताना आम्हाला क्लस्टरमध्ये विकेट गमावणं परवडणारं नाही. अजून स्पर्धेची सुरुवात आहे आणि आम्ही ड्रेसिंग रूममध्ये याबद्दल बोललो आहोत. आम्हाला पॉवरप्लेचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल. आमच्या संघात कोणताही बदल नाही.
दोन्ही संघाची प्लेइंग 11 :
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, आयुष बदोनी, निकोलस पूरन (कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, क्रुणाल पांड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, मयंक यादव, मणिमारन सिद्धार्थ
इम्पॅक्ट प्लेअर्स – ॲश्टन टर्नर, नवीन-उल-हक, अमित मिश्रा, दीपक हुडा, के गौथम
पंजाब किंग्ज – शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग
इम्पॅक्ट प्लेअर्स – प्रभसिमरन सिंग, रिली रौसो, तनय थागराजन, विद्वत कवेरप्पा, हरप्रीत भाटिया
आयपीएल 2024 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सची सुरुवात खराब झाली आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाला पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून 20 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे, पंजाब किंग्ज संघानं दोन सामने खेळले आहेत. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जनं त्यांच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. मात्र दुसऱ्या सामन्यात त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभवाचा सामना करावा लागला. पंजाब किंग्ज गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे, तर लखनऊ शेवटच्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2024 मध्ये दिसेल आता रिंकू सिंहचा जलवा! विराट कोहलीनं भेट केली आपली खास वस्तू
“यांना ‘ऑस्कर अवॉर्ड’ द्यायला हवा”, विराट-गंभीरच्या मिठी मारण्यावरून सुनील गावसकरांची फिरकी
IPL 2024 मधील कामगिरीवरून आइसलँड क्रिकेटनं उडवली मिचेल स्टार्कची खिल्ली! सोशल मीडिया पोस्ट व्हायरल