---Advertisement---

IPL 2024 मध्ये दिसेल आता रिंकू सिंहचा जलवा! विराट कोहलीनं भेट केली आपली खास वस्तू

---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात 59 चेंडूत 83 धावांची दमदार खेळी केली. चालू मोसमातील त्याचं हे सलग दुसरं अर्धशतक आहे. मात्र, त्याच्या स्फोटक खेळीनंतरही बंगळुरूला सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. सामना संपल्यानंतर विराट कोहलीनं कोलकाताची स्टार फलंदाज रिंकू सिंहला एक खास भेट दिली.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या विराट कोहलीनं सामन्यानंतर रिंकू सिंहला आपली बॅट भेट दिली, ज्याचे फोटो कोलकाता नाईट रायडर्सनं त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. रिंकू सिंहनंही विराट कोहलीचे बॅट भेट दिल्याबद्दल आभार मानले आहेत. रिंकू सिंहनं त्याच्या इंस्टाग्रामवर विराटसोबतचे फोटो शेअर केले आणि लिहिलं, “बॅट आणि मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद भाऊ.”

 

आयपीएल 2024 मध्ये विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यानं पंजाब किंग्ज विरुद्ध 77 धावांची मॅच-विनिंग इनिंग खेळली, तर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 83 धावा केल्या. विराट कोहली आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्यानं तीन डावात 181 धावा करत ‘ऑरेंज कॅप’ वर कब्जा केलाय.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, आरसीबीच्या 183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना व्यंकटेश अय्यर (50 धावा 30 चेंडू) आणि सुनील नरेन (47 धावा 22 चेंडू) यांच्या झंझावाती खेळीमुळे नाइट रायडर्स संघानं 19 चेंडू शिल्लक असताना तीन गड्यांच्या मोबदल्यात 186 धावा करून सहज विजयाची नोंद केली. नरेन आणि फिल सॉल्ट (30 धावा 20 चेंडू, दोन षटकार, दोन चौकार) यांनी पहिल्या विकेटसाठी 6.3 षटकांत 86 धावा जोडून संघाला जोरदार सुरुवात करून दिली. तर व्यंकटेशनं कर्णधार श्रेयस अय्यर (नाबाद 39 धावा 24 चेंडू, दोन चौकार, दोन षटकारांसह) सोबत मिळून तिसऱ्या विकेटसाठी 75 धावा जोडल्या. यामुळे केकेआरच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

महत्त्वाच्या बातम्या-

“यांना ‘ऑस्कर अवॉर्ड’ द्यायला हवा”, विराट-गंभीरच्या मिठी मारण्यावरून सुनील गावसकरांची फिरकी

IPL 2024 मधील कामगिरीवरून आइसलँड क्रिकेटनं उडवली मिचेल स्टार्कची खिल्ली! सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

आरसीबीच्या स्वप्नांची धुळधाण उडवणाऱ्या व्यंकटेश अय्यरने मारलेला सर्वांत लांब षटकार पाहिलात का? – पाहा Video

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---