पुणे (30 मार्च 2024) – क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज मध्ये रेलीगेशन फेरीचे सामने सुरू आहेत. आज दुसरा सामना लातूर विरुद्ध नाशिक यांच्यात झाला. नाशिक संघानं आतापर्यंत 2 विजय नोंदवले आणि 1 सामना बरोबरीत राहिला. तर लातूर संघानं आतापर्यंत 1 विजय नोंदवत 2 पराभव स्वीकारले होते.
सामन्याची सुरुवात अत्यंत संथ झाली. त्यानंतर नाशिकच्या शिवकुमार बोरगुडे व ईश्वर पथाडे यांनी चतुरस्त्र चढाया करत सामन्यात आघाडी मिळवली. सामन्याच्या आठव्या मिनिटाला नाशिक संघाने लातुर संघाला ऑल आऊट करत 12-03 अशी आघाडी मिळवली.
नाशिक संघाने आपला आक्रमक खेळ कायम ठेवत मध्यंतरापूर्वी लातूर संघाला आणखी एकदा ऑल आऊट करत संघाची आघाडी वाढवली. मध्यंतराला नाशिक संघाकडे 28-09 अशी निर्यायक आघाडी होती. मध्यंतरानंतर शिवकुमार बोरगुडे व ईश्वर पथाडे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाची आघाडी वाढवत सामन्यावर पकड मजबूत केली. नाशिक संघाने लातूर संघाला पुन्हा ऑल आऊट करत आपला विजय सुनिश्चित केला. नाशिक संघाने लातूर संघावर 47-24 असा विजय मिळवला.
रेलीगेशन मध्ये हा नाशिक संघाचा सलग तिसरा विजय ठरला. नाशिकच्या शिवकुमार बोरगुडे व ईश्वर पथाडेने सुपर टेन पूर्ण करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका निभावली. शिवकुमारने पकडीत सुद्धा 2 गुण मिळवले. गणेश गीतेने पकडीत एकूण 4 गुण मिळवले. ऋषिकेश गडाखने चढाईत 6 गुण मिळवले. लातूरकडून अजिंक्य कटलेने आजसुद्धा चांगली खेळी केली.
बेस्ट रेडर- शिवकुमार बोरगुडे, नाशिक
बेस्ट डिफेंडर- गणेश गीते, नाशिक
कबड्डी का कमाल – ईश्वर पथाडे, नाशिक
महत्त्वाच्या बातम्या-
रेलीगेशन फेरीत धुळे व जालना संघाचा सलग दुसरा विजय
रेलीगेशन फेरीत नाशिक संघाचा पहिला विजय
रेलीगेशन फेरीत जालना संघाचा सलग दुसरा विजय, तर लातूर संघाचा दुसरा पराभव