आयपीएल 2024च्या 34व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्समोर चेन्नई सुपर किंग्जचं आव्हानं होतं. लखनऊच्या एकना स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. लखनऊनं चेन्नईवर 8 गडी राखून सहज विजय मिळवला आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईनं निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 176 धावा केल्या होत्या. लखनऊनं हे लक्ष्य 19 षटकांत केवळ 2 गडी गमावून गाठलं.
लखनऊनं नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. चेन्नईकडून रवींद्र जडेजानं शानदार फलंदाजी केली. तो 40 चेंडूत 57 धावा करून नाबाद राहिला. आपल्या या खेळीत त्यानं 5 चौकार आणि 1 षटकार ठोकला. सलामीवीर अजिंक्य रहाणेनं 24 चेंडूत 36 आणि मोईन अलीनं 20 चेंडूत 30 धावांचं योगदान दिलं. रचिन रवींद्र पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मोहसिन खाननं त्याची विकेट घेतली. कर्णधार ऋतुराज गायकवाड 13 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. शिवम दुबेनं 8 चेंडूत 3 आणि समीप रिझवीनं 5 चेंडूत 1 धाव केली.
चेन्नईसाठी महेंद्रसिंह धोनीनं अखेरच्या षटकांमध्ये धडाकेबाज फलंदाजी केली. धोनीनं अवघ्या 9 चेंडूत 28 धावा ठोकल्या. आपल्या या खेळीत त्यानं 3 चौकार आणि 2 षटकार लगावले. लखनऊकडून क्रुणाल पांड्यानं शानदार गोलंदांजी केली. क्रुणालनं 3 षटकांमध्ये 16 धावा देत 2 बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सनं चांगली सुरुवात केली. पॉवरप्लेमध्ये डी कॉक आणि राहुलच्या जोडीनं 54 धावा केल्या. या दोघांनी कोणतीही जोखीम न घेता पहिल्या विकेटसाठी 134 धावांची भागीदारी केली. दोघांनीही आपापलं अर्धशतक साजरं केलं. डी कॉक 43 चेंडूत 55 धावा करून बाद झाला. तो मुस्तफिझूरचा बळी ठरला. त्यानं त्याला विकेटच्या मागे झेलबाद केलं. डी कॉकनं 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर केएल राहुल 53 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 82 धावा करून बाद झाला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसीन खान, यश ठाकूर
इम्पॅक्ट प्लेअर्स – अर्शीन कुलकर्णी, कृष्णप्पा गौथम, युधवीर सिंग, मणिमरण सिद्धार्थ, अर्शद खान
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना
इम्पॅक्ट प्लेअर्स – समीर रिझवी, शार्दुल ठाकूर, शेख रशीद, निशांत सिंधू, मिचेल सँटनर
महत्त्वाच्या बातम्या –
लखनऊमध्ये जिकडे-तिकडे फक्त धोनीचेच फॅन्स!…दीपक चहरही हैराण, इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ
मोहिसनचा ऑर्कर अन् रवींद्र चारी मुंड्या चित! पहिल्याच चेंडूवर पकडला पॅव्हेलियनचा रस्ता; पाहा VIDEO