हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स बुधवारी (26 मार्च) सरनयाजर्स हैदराबादविरुद्ध मैदानात उतरली. हार्दिकने या सामन्याची नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईचा माजी कर्णधार या फ्रँचायझीकडून 200वा सामना खेळत आहे. तत्पूर्वी माजी दिग्गज सचिन तेंडुलकर याच्याकडून रोहितला खास जर्सी भेट मिळाली, ज्यावर 200आकडा लिहिली आहे.
मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळत आहे. क्वेना मफाका याने ल्यूक वूड याची जागा घेतली आहे. तर सनरायजर्स हैदराबादमध्ये दोन बदल पाहायला मिळाले. ट्रेव्हिस हेड आणि जयदेव उनाडकट यांनी मार्को जेनसन आणि टी-नटराजन यांची संघातील जागा घेतली. मुंबईसाठी चालू हंगामातील हा दुसरा सामना असून पहिला विजय मिळवण्याची संधी आहे. दुसरीकडे हैदराबाद देखील पहिल्या विजयाच्या शोधात आहे.
मुंबई इंडियन्सने हंगामातील आपला पहिला सामना गुजरात टायटन्सविरुद्ध खेळला होता. या सामन्यात गुजरातकडून मुंबईला 6 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. मागच्या वर्षी गुजरातचे नेतृत्व करणारा हार्दिक पंड्या यावर्षी मुंबईचा कर्णधार आहे. पण आपल्या जुन्या संघाविरुद्ध खेळताना हार्दिक मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देऊ शकला नाही. शुबमन गिल या नवख्या कर्णधाराने हंगामातील पहिल्या सामन्यात गुजरातला विजय मिळवून दिला होता. (IPL 2024 MI vs SRH MI won the toss & decided to chase)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
सनरायझर्स हैदराबादः मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.
प्रभावशाली खेळाडू: नितीश कुमार रेड्डी, ग्लेन फिलिप्स, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, उपेंद्र यादव
मुंबई इंडियन्स : ईशान किशन, रोहित शर्मा, नमन धीर, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका.
प्रभावशाली खेळाडू: डेवाल्ड ब्रेविस, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, नेहल वढेरा, विष्णू विनोद
महत्वाच्या बातम्या –
रोहितचा महाविक्रम! सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मैदानात उतरण्याआधी सचिनकडून मिळालं खास गिफ्ट
धोनी भूतकाळात गेला आहे? सीएसकेच्या माजी कर्णधाराचे ऑस्ट्रेलियन दिग्गजाकडून कौतुक