---Advertisement---

रोहितचा महाविक्रम! सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मैदानात उतरण्याआधी सचिनकडून मिळालं खास गिफ्ट

---Advertisement---

रोहित शर्मा इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार नाहीये. हार्दिक पंड्या यावर्षी मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत असून रोहित त्याच्या नेतृत्वात खेळताना दिसत आहे. कर्णधार हार्दिक हंगामातील पहिल्या सामन्यात संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. पण दुसऱ्या सामन्यात संघ विजयासाठी खेळत आहे. माजी कर्णधार रोहितने या सामन्यासाठी मैदानात पाय टाकताच त्याच्या नावावर एक महाविक्रम नोंदवला गेला.

रोहित शर्मा (Rohit Sharma) इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स फ्रँचायझीकडून 200 सामने खेळणारा पहिलाच खेळाडू बनला आहे. त्याने मुंबईसाठी आतापर्यंत खेळलेल्या 199 सामन्यांमध्ये 5084 धावा केल्या आहेत. बुधवारी (26 मार्च) मुंबईसमोर या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाचे आव्हान आहे. या सामन्याला सुरुवात होण्याआधी भारतीय संघाचा महान कर्णधार सचिन तेंडुलकर याने रोहित शर्माला पाठीवर 200 आकडा लिहिलेली खास जर्सी भेट दिली. यावेळी संघातील इतर सहकारी खेळाडू देखील उफस्थित होते.

तत्पूर्वी हंगामातील पहिल्या सामन्यात रोहित चांगल्या फॉर्ममध्ये दिसला होता. त्याने गुजरात टायटन्सविरुद्धच्या या सामन्यात 29 चेंडूत 43 धावा केल्या होत्या. तिसऱ्या विकेटसाठी डेवॉल्ड ब्रेविस याच्यासोबत 77 धावांची भागीदारी देखील केली होती. (Rohit’s record! A special gift from Sachin Tendulkar before taking the field against Sunrisers Hyderabad)

महत्वाच्या बातम्या – 
“मुंबईत हार्दिक पांड्याविरोधात आणखी हूटिंग होईल”, माजी क्रिकेटपटूनं व्यक्त केली भीती
विराट कोहली गुगलवर सर्वाधिक सर्च केला जाणारा क्रिकेटपटू, जाणून घ्या रोहित-धोनीचा क्रमांक कितवा?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---