आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यानंतर रॉयल्सचा रियान पराग ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत त्यानं रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूच्या विराट कोहलीला मागे टाकलं. रियान परागनं दिल्लीविरुद्ध नाबाद 84 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर त्याच्या नावावर आयपीएल 2024 मध्ये 127 धावा झाल्या आहेत. आता त्याच्या पुढे फक्त सनरायजर्स हैदराबादचा हेनरिक क्लासेन आहे, जो 143 धावांसह यादीत अव्वल आहे. तर विराट कोहलीची 98 धावांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉप-5 फलंदाजांबद्दल बोलायचं तर, हेनरिक क्लासेन, रियान पराग आणि विराट कोहली यांच्याशिवाय या यादीत आणखी दोन भारतीय खेळाडू आहेत. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन चौथ्या तर सनरायजर्स हैदराबादचा अभिषेक शर्मा पाचव्या स्थानावर आहे. या दोघांच्या नावे अनुक्रमे 97 आणि 95 धावा आहेत.
आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर, चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्यानं आतापर्यंत खेळलेल्या 2 सामन्यात 6 विकेट्स घेतल्या आहेत. राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यानंतर फिरकीपटू युजवेंद्र चहलनं टॉप-5 गोलंदाजांमध्ये प्रवेश केला. चहलनं दिल्लीविरुद्ध 3 षटकांत 19 धावा देत 2 बळी घेतले. आता आयपीएल 2024 मध्ये त्याच्या नावावर तीन विकेट्स आहेत. मुस्तफिजूर वगळता टॉप-5 मधील इतर चारही गोलंदाजांच्या नावावर 3-3 विकेट आहेत.
आयपीएल 2024 ऑरेंज कॅपची शर्यत-
- हेनरिक क्लासेन – 143 धावा (2 सामने), 226 स्ट्राईक रेट
- रियान पराग – 127 धावा (2 सामने) – 171 स्टाईक रेट
- विराट कोहली – 98 धावा (2 सामने) – 142 स्ट्राईक रेट
- संजू सॅमसन – 97 धावा (2 सामने) – 146 स्ट्राईक रेट
- अभिषेक शर्मा – 95 धावा (2 सामने) – 226 स्ट्राईक रेट
आयपीएल 2024 पर्पल कॅपची शर्यत-
- मुस्तफिजूर रहमान – 6 बळी (2 सामने) – 9.83 सरासरी
- हरप्रीत ब्रार – 3 बळी (2 सामने) – 9.00 सरासरी
- जसप्रीत बुमराह – 3 बळी (2 सामने) – 16.67 सरासरी
- युजवेंद्र चहल – 3 बळी (2 सामने) – 14.67 सरासरी
- कागिसो रबाडा – 3 बळी (2 सामने) – 19.67 सरासरी
महत्त्वाच्या बातम्या-
“धोनीला पाहताच मोहित शर्मानं…”, मैदानावरील व्हिडिओ व्हायरल, तुम्हीही एकदा पाहाच
राजस्थान रॉयल्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा पुन्हा पराभव, ऋषभ पंतच्या संघाच्या पराभवाचं कारण काय?
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलला स्लो-ओव्हर रेटसाठी दंड, इतक्या रुपयांचा फाइन भरावा लागणार