IPLक्रिकेटटॉप बातम्या

“धोनीला पाहताच मोहित शर्मानं…”, मैदानावरील व्हिडिओ व्हायरल, तुम्हीही एकदा पाहाच

क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा अशा अनेक घटना घडतात ज्यामुळे चाहत्यांची मनं जिंकली जातात. आयपीएल 2024 च्या 7 व्या सामन्यातही असंच काहीसे घडलं, जेव्हा गुजरात टायटन्सचा सामना संपल्यानंतर संघाचा गोलंदाज मोहित शर्मानं महेंद्रसिंह धोनीचा विशेष सन्मान केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही घटना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यानंतर घडली. सीएसकेनं गुजरातचा 63 धावांनी पराभव केला. त्यानंतर सर्व खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करण्यासाठी मैदानात आले. दरम्यान, मोहित शर्मानं महेंद्रसिंह धोनीला पाहताच लगेच आपली कॅप काढली. कॅप काढल्यानंतर मोहितनं धोनीशी हस्तांदोलन केलं आणि नंतर त्याला मिठी मारली.

मोहित शर्मा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडूनही खेळला आहे. मोहितनं महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भरपूर क्रिकेट खेळलं आहे. त्यानं आपल्या दमदार गोलंदाजीनं चेन्नईला अनेक सामने जिंकून दिले आहेत. याशिवाय मोहितनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटही धोनीच्या नेतृत्वाखालीच खेळलं नाही. यामुळेच मोहित शर्मा एमएस धोनीचा आदर करतो आणि याच कारणामुळे जेव्हा मोहितनं धोनीशी हस्तांदोलन केलं तेव्हा तो त्याचा आदर करताना दिसला.

 

मोहित शर्मानं 2013 ते 2015 दरम्यान भारतासाठी 26 एकदिवसीय आणि 8 टी20 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्यानं एकदिवसीय सामन्यांमध्ये 31 आणि टी20 मध्ये 6 बळी घेतले आहेत. मोहित शर्माचं आयपीएल करिअर दमदार राहिलं आहे. त्यानं आयपीएलच्या 102 सामन्यात 122 बळी घेतले आहेत. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्सकडून खेळला आहे.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, चेन्नईनं प्रथम फलंदाजी करताना 6 गडी गमावून 206 धावा केल्या. चेन्नईकडून शिवम दुबेनं शानदार फलंदाजी करत 51 धावांची खेळी केली. रचिन रवींद्र आणि कर्णधार गायकवाड यांनी 46-46 धावांचं योगदान दिलं. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला 8 विकेट्स गमावून केवळ 143 धावा करता आल्या. साई सुदर्शननं सर्वाधिक 37 धावांचं योगदान दिलं.

महत्त्वाच्या बातम्या-

राजस्थान रॉयल्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा पुन्हा पराभव, ऋषभ पंतच्या संघाच्या पराभवाचं कारण काय?

पहिल्याच चेंडूवर षटकार, राशिद खानलाही चोपलं! चेन्नईच्या 8.4 कोटींच्या खेळाडूची फलंदाजी पाहून धोनीही हैराण

वय 35 अन् चपळता चित्त्यासारखी! अजिंक्य रहाणेनं हवेत उडी मारून घेतलेला ‘हा’ झेल एकदा पाहाच

Related Articles