आयपीएल 2024 चा 37 वा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे. पंजाबचा कर्णधार सॅम करननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंजाबचा कर्णधार सॅम करन – आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. आम्ही गुजरातच्या गोलंदाजांवर प्रथम दबाव आणण्याचा आणि स्कोर बोर्डवर चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू. कोणताही संघ कोणालाही हरवू शकतो. आम्हाला माहित आहे की आम्ही योग्य योजना आणि वृत्तीनं आलो तर आम्ही जिंकू शकतो. शिखर अजूनही बरा नाही. आमच्या संघात कोणताही बदल नाही.
गुजरातचा कर्णधार शुबमन गिल – आम्ही प्रथम गोलंदाजीच केली असती. शेवटच्या सामन्याप्रमाणेच विकेट आहे. या सामन्यासाठी ओमरझाई परत आला आहे. त्याला निगल आला होता. तो स्पेन्सरची जागा घेतोय. जर आम्ही त्यांना 170 च्या आसपास रोखू शकलो तर आम्हाला आनंद होईल.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
पंजाब किंग्ज – सॅम करन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, रिली रोसो, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग
इम्पॅक्ट प्लेअर्स – राहुल चहर, विद्वत कवेरप्पा, अथर्व तायडे, हरप्रीत सिंग भाटिया, शिवम सिंग
गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, संदीप वॉरियर, मोहित शर्मा
इम्पॅक्ट प्लेअर्स – साई सुदर्शन, शरथ बीआर, मानव सुथार, दर्शन नळकांडे, विजय शंकर
या हंगामात पंजाब किंग्जची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. संघानं सात सामने खेळले असून त्यांना केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत. पंजाबनं मागील सलग तीन सामने गमावले आहेत. पॉइंट टेबलमध्ये संघ 4 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. नियमित कर्णधार शिखर धवनच्या दुखापतीमुळे पंजाबची फलंदाजी कमकुवत दिसत आहे.
दुसरीकडे, गुजरात टायटन्स संघानं या हंगामात संमिश्र कामगिरी केली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली संघानं 7 सामने खेळले असून तीन जिंकले आहेत. ते गुणतालिकेत 6 अंकांसह आठव्या स्थानावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
बाद की नाबाद? आऊट दिल्यानंतर अंपायरवरच भडकला विराट कोहली, नो-बॉलवरून मोठा राडा!