आयपीएल 2024 मध्ये आजच्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. मुल्लानपूरच्या महाराजा यादवेंद्र सिंग स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
पंजाबचा कर्णधार शिखर धवन – आम्ही प्रथम गोलंदाजी करू. विकेट तशीच राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आम्ही त्यांना कमी धावसंख्येपर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करू. आम्ही कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून नाही. आम्ही दोन गेम जिंकले आहेत. चांगल्या धावांची अपेक्षा आहे. लियाम लिव्हिंगस्टोन अजूनही बरा होत आहे. आमच्या संघात कोणताही बदल नाही.
हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स – आम्हीही प्रथम गोलंदाजी केली असती. आम्ही ज्या वाटोनं जात आहोत, त्याबद्दल एकूणच आनंदी आहोत. आमच्या संघात चांगली ताकद आहे. आमच्या संघात कोणताही बदल नाही.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
पंजाब किंग्ज – शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, सिकंदर रझा, शशांक सिंह, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग
इम्पॅक्ट प्लेअर्स – प्रभसिमरन सिंग, नॅथन एलिस, तनय त्यागराजन, राहुल चहर, ऋषी धवन
सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन
इम्पॅक्ट प्लेअर्स – उमरान मलिक, मयंक मार्कंडे, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, राहुल त्रिपाठी
पंजाबनं या हंगामात आतापर्यंत चार सामन्यांपैकी दोन सामने जिंकले असून, दोन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. पंजाबने गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा तीन गडी राखून पराभव केला होता. या सामन्यात शशांक सिंहनं स्फोटक अर्धशतक ठोकलं होतं.
दुसरीकडे, पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबादचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. सनरायझर्सनं दोन सामने जिंकले असून दोन गमावले आहेत. हैदराबादनं गेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला होता. या सामन्यात हैदराबादला सलामीवीर अभिषेक शर्माकडून पुन्हा एकदा तुफानी खेळीची अपेक्षा असेल. त्यानं चेन्नईविरुद्ध 12 चेंडूत 37 धावा केल्या होत्या.
दोन्ही संघांच्या हेड-टू-हेड आकडेवारीबद्दल बोलायचं झालं तर, पंजाबविरुद्ध हैदराबादचा वरचष्मा राहिला आहे. दोन्ही संघ आयपीएलमध्ये एकूण 21 वेळा आमनेसामने आले असून, त्यापैकी हैदराबादनं 14 आणि पंजाबनं 7 सामने जिंकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिक पांड्याला टी20 विश्वचषकात जागा मिळणार नाही? माजी मुख्य निवडकर्त्यानं केलं मोठं विधान
पांड्या बंधूंनी गायलं ‘हरे रामा-हरे कृष्णा’, भजनाच्या तालावर बेधुंद नाचले!
‘सर’ जडेजानं केली ‘थाला’ची बरोबरी, एमएस धोनीचा आयपीएलमधील मोठा रेकॉर्ड धोक्यात