आयपीएल 2024 च्या 65व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स समोर पंजाब किंग्जचं आव्हान होतं. आसामच्या गुवाहाटी येथील स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. पंजाब किंग्जनं राजस्थान रॉयल्सचा 5 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थाननं 20 षटकांत 9 गडी गमावून 144 धावा केल्या होत्या. पंजाबनं हे लक्ष्य 18.5 षटकांत 5 गडी गमावून गाठलं.
धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खराब झाली. ट्रेंट बोल्टनं पहिल्याच षटकात धक्का दिली. त्यानं प्रभसिमरन सिंगला 6 धावांवर बाद केलं. रिले रुसो 22 धावा करून बाद झाला. जॉनी बेयरस्टो सपशेल अपयशी ठरला. तो 22 चेंडूत 14 धावा करून तंबूत परतला. शशांक सिंह आज भोपळाही फोडू शकला नाही.
यानंतर कर्णधार सॅम करन आणि उपकर्णधार जितेश शर्मा यांनी डाव सांभाळला. या दोघांमध्ये 63 धावांची भागीदारी झाली. जितेश शर्मा 20 चेंडूत 22 धावा करून बाद झाला. सॅम करननं अर्धशतकी खेळी खेळली. तो 41 चेंडूत 63 धावा करून नाबाद राहिला. आशुतोष शर्मानं 17 धावा केल्या. राजस्थानकडून आवेश खान आणि युझवेंद्र चहलनं 2-2 बळी घेतले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सनं 42 धावांवरच 3 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर 92 ते 102 धावांमध्ये त्यांनी आणखी 3 गडी गमावले. मात्र रियान परागनं एका बाजून मोर्चा सांभाळून ठेवत शानदार खेळी खेळली. त्याचं अर्धशतक मात्र हुकलं. पराग 34 चेंडूत 48 धावा करून बाद झाला.
रविचंद्रन अश्विननं 28 धावा केल्या. या दोघांशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा गाठता आला नाही. राजस्थाननं 20 षटकात 9 गडी गमावून 144 धावा केल्या. पंजाबकडून सॅम करन, हर्षल पटेल आणि राहुल चहर यांनी 2-2 बळी घेतले. तर अर्शदीप सिंग आणि नॅथन एलिसनं 1-1 विकेट घेतली.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टिरक्षक), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युझवेंद्र चहल
इम्पॅक्ट प्लेअर्स – नांद्रे बर्गर, तनुष कोटियन, केशव महाराज, कुलदीप सेन, डोनोवन फरेरा
पंजाब किंग्ज – प्रभसिमरन सिंग, जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंह, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), सॅम करन (कर्णधार), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, नॅथन एलिस, राहुल चहर, अर्शदीप सिंग
इम्पॅक्ट प्लेअर्स – तनय त्यागराजन, ऋषी धवन, विद्वत कवेरप्पा, आशुतोष शर्मा, हरप्रीत सिंग भाटिया
महत्त्वाच्या बातम्या –
राजस्थानच्या टॉम कोहलर कॅडमोरनं घातलेला खास नेक बँड काय आहे? क्रिकेटमध्ये त्याचं काय काम? जाणून घ्या
मुंबई इंडियन्सनं रिटेन नाही केलं तर रोहित शर्मा कोणत्या टीममध्ये जाणार? हिटमॅनकडे आहेत ‘हे’ पर्याय
नेपाळचा स्टार क्रिकेटपटू संदीप लामिछानेला कोर्टाकडून क्लीन चिट, बलात्काराचा होता आरोप