द पूना क्लब लिमिटेड यांच्या वतीने आयोजित पूना क्लब स्क्वॅश ओपन आणि पीएसए चॅलेंजर टूर स्पर्धेत महाराष्ट्राच्या सूरज चंद याने पीएसए पुरूष गट व खुल्या पुरुष या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट, तर पीएसए महिला गटात उर्वशी जोशी हीने विजेतेपद पटकावले. तर, आराध्या पोरवाल, उर्वशी जोशी, धैर्य गोगिया, शनाया परसरामपुरिया, ध्रुव बोपना, अनिका कलंकी, रिधान शहा, आरिका मिश्रा, शिवेन अग्रवाल, करीना फिप्स, प्रियांशू कुमार व शमीना रियाझ यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
पूना क्लब येथील स्क्वॅश कोर्टवर 8 मे पासून सुरु झालेल्या स्पर्धेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणारी एकुण 707 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. पीएसए पुरुष गटातअंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित सूरज चंद याने अव्वल मानांकित आर लक्षीरीचा 12-14, 11-8, 11-6, 12-10 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. महिला गटात अव्वल मानांकित उर्वशी जोशीने दिया यादवचा 11-9, 9-11, 11-8, 11-5 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. खुल्या पुरुष गटात अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या अव्वल मानांकित सूरज चंदने सर्व्हिसेसच्या तिसऱ्या मानांकित दिवाकर सिंगचा 11-3 11-1 11-5 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. महिला गटात दिल्लीच्या तिसऱ्या मानांकित आराध्या पोरवालने महाराष्ट्राच्या अव्वल मानांकित सुनीता पटेलचा 11-8 11-8 3-11 11-6 असा पराभव करुन विजेतेपदाचा मान पटकावला.
11 वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम लढतीत राजस्थानच्या अव्वल मानांकित धैर्य गोगियाने तेलंगणाच्या तनुज रेड्डी पुलीचा 11-7 9-11 11-9 11-6 असा तर, मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या शनाया परसरामपुरियाने हरियाणाच्या आध्या ग्रोवरचा 11-8 12-10 11-6 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. 13 वर्षांखालील मुलांच्या गटात अव्वल मानांकित तामिळनाडूच्या ध्रुव बोपनाने राजस्थानच्या फरीद अंद्राबीचा 11-8 19-17 11-8 असा तर, मुलींच्या गटात अव्वल मानांकित मध्यप्रदेशच्या अनिका कलंकीने तेलंगणाच्या अर्ना द्विवेदीचा 11-2 9-11 11-7 7-11 11-8 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
15 वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या अव्वल मानांकित रिधान शहाने आपला राज्य सहकारी अगस्त्य बन्सलचा 11-3 12-10 7-11 11-6 असा तर, मुलींच्या गटात अव्वल मानांकित महाराष्ट्राच्या आरिका मिश्रा हिने मध्यप्रदेशच्या सानवी कलंकीचा 13-15 11-8 12-10 11-7 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 17 वर्षांखालील गटात तामिळनाडूच्या शिवेन अग्रवाल व महाराष्ट्राच्या करीना फिप्स यांनी,
19 वर्षांखालील उत्तरप्रदेशच्या प्रियांशू कुमार व तामिळनाडूच्या शमीना रियाझ यांनी विजेतेपद मिळवले. स्पर्धेला ब्रहम, अतुर इंडिया, गरवारे, एलिका, रुबी हॉल, अथ इलाईट स्पोर्ट्स क्लब, द रेसिडेन्सी क्लब, द वेस्टीन पुणे कोरेगाव पार्क आणि आरएसआय पुणे यांचा पाठिंबा लाभला होता.
35 वर्षांवरील गटात संदीप जांगरा, 40 वर्षांवरील गटात पॉल इपे, 45 वर्षावरील गटात बेंजामिन नेदारापल्ली, 50 वर्षांवरील गटात विकास नायर, 55 वर्षांवरील गटात इंद्रजीत सिंग, 60 वर्षांवरील गटात अजय कोहली, 65 वर्षांवरील गटात विजय जैनी यांना विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व आकर्षक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पूना क्लब लिमिटेडचे अध्यक्ष सुनील हांडा, पूना क्लब लिमिटेडचे
उपाध्यक्ष व स्पर्धेचे चेअरमन गौरव गढोक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक रवणीत सिंग, एसआरएफआय समन्वयक कुंवरपाल सिंग, मुख्य प्रायोजक ब्रहम टीम आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: पीएसए पुरुष गट: अंतिम फेरी:
सूरज चंद(महा)(2) वि.वि.आर लक्षीरी(1) 12-14, 11-8, 11-6, 12-10;
पीएसए महिला: उर्वशी जोशी(1)वि.वि.दिया यादव 11-9, 9-11, 11-8, 11-5;
खुला पुरुष गट: उपांत्य फेरी:
सूरज चंद(महा)(1)वि.वि.ओम सेमवाल(महा)11-5 11-6 11-1;
दिवाकर सिंग(सर्व्हिसेस)(3)वि.वि.रणजित सिंग(सर्व्हिसेस)11-5 12-10 11-1;
अंतिम: सूरज चंद (महा)(1)वि.वि.दिवाकर सिंग(सर्व्हिसेस)(3)11-3 11-1 11-5;
महिला: उपांत्य फेरी:
सुनीता पटेल(महा)(1)वि.वि.राणी गुप्ता(महा)11-7 11-2 11-0;
आराध्या पोरवाल(दिल्ली)(3)वि.वि.अनन्या पांडे(चंदीगढ)11-6 11-5 11-7
अंतिम: आराध्या पोरवाल(दिल्ली)(3)वि.वि.सुनीता पटेल(महा)(1)11-8 11-8 3-11 11-6;
11 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
धैर्य गोगिया(राजस्थान)(1)वि.वि.मोहम्मद तोहीदतनवीर(मध्यप्रदेश)11-4 11-8 11-5;
तनुज रेड्डी पुली(तेलंगणा) वि.वि.ऋषभ श्याम (3)(महा)11-8 8-11 11-8 11-9;
अंतिम: धैर्य गोगिया(राजस्थान)(1)वि.वि.तनुज रेड्डी पुली(तेलंगणा)11-7 9-11 11-9 11-6;
11 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
शनाया परसरामपुरिया(महा)(1)वि.वि.आलिया कांकरिया(पश्चिम बंगाल)11-9 1-11 4-11 13-11 11-4;
आध्या ग्रोव्हर(हरियाणा)वि.वि.अरणा पांडे(कर्नाटक)(5)11-9 2-11 5-11 11-8 11-3
अंतिम: शनाया परसरामपुरिया(महा)(1)वि.वि.आध्या ग्रोवर(हरियाणा)11-8 12-10 11-6;
13 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
ध्रुव बोपना(तामिळनाडू)(1)वि.वि.अद्वित तनेजा(झारखंड)11-3 11-7 11-3;
फरीद अंद्राबी(राजस्थान)वि.वि.ध्रुव जोहरी(हरियाणा)(3)11-8 7-11 11-8 4-11 11-9;
अंतिम: ध्रुव बोपना(तामिळनाडू)(1)वि.वि.फरीद अंद्राबी(राजस्थान)11-8 19-17 11-8;
13 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
अनिका कलंकी(मध्यप्रदेश)(1)वि.वि.नेहमत नायर(चंदीगढ)11-5 11-4 11-4;
अर्ना द्विवेदी(तेलंगणा)(3)वि.वि.वसुंधरा नांगरे(महा)11-8 11-9 6-11 11-5;
अंतिम: अनिका कलंकी(मध्यप्रदेश)(1)वि.वि.अर्ना द्विवेदी(तेलंगणा)(3)11-2 9-11 11-7 7-11 11-8;
15 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
रिधान शहा(महा)(1)वि.वि.हर्षल राणा(हरियाणा)11-4 5-11 11-6 11-8;
अगस्त्य बन्सल(महा)वि.वि. श्रेयांश झा(महा)(3)10-12 13-11 11-6 11-5;
अंतिम फेरी: रिधान शहा(महा)(1)वि.वि.अगस्त्य बन्सल(महा)11-3 12-10 7-11 11-6;
15 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
आरिका मिश्रा(महा)(1)वि.वि.आहाना सिंग(दिल्ली)11-7 11-5 11-3;
सानवी कलंकी(मध्यप्रदेश)वि.वि. डी नितियाश्री(तामिळनाडू)(3)11-5 11-7 11-6;
अंतिम फेरी: आरिका मिश्रा(महा)(1)वि.वि.सानवी कलंकी(मध्यप्रदेश)13-15 11-8 12-10 11-7;
17 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
देव शर्मा(महा)(1)वि.वि.पुरव रांभिया(महा)11-6 11-6 11-5;
शिवेन अग्रवाल(तामिळनाडू) पुढे चाल.वि.प्रियान ठक्कर(3)सामना सोडून दिला;
अंतिम फेरी: शिवेन अग्रवाल(तामिळनाडू)वि.वि.देव शर्मा(महा)(1)11-8 11-2 8-11 13-11;
17 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
ईशा श्रीवास्तव(महा)वि.वि.छवी सरन(राजस्थान)(1)11-6 11-9 11-3;
करीना फिप्स(महा)वि.वि.अनन्या नारायणन(तामिळनाडू)(3)12-10 11-5 11-7;
अंतिम फेरी: करीना फिप्स(महा)वि.वि.ईशा श्रीवास्तव(महा)11-9 9-11 11-5 11-5;
19 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
प्रियांशू कुमार(उत्तरप्रदेश)वि.वि.सिद्धांत रेवाडी(महा)(1)11-8 11-9 3-11 11-6;
उदित मिश्रा(राजस्थान)(9)वि.वि.आदिव देवय्या(कर्नाटक)5-11 11-7 5-11 11-9 11-7;
अंतिम फेरी: प्रियांशू कुमार(उत्तरप्रदेश)वि.वि.उदित मिश्रा(राजस्थान)(9)11-8 15-13 11-3 11-5;
19 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
रुद्र सिंग(महा)वि.वि.यशी जैन(राजस्थान)11-2 11-6 11-2;
शमीना रियाझ(तामिळनाडू)वि.वि.खुशी जसपाल(महा)(3)11-5 11-6 11-2;
अंतिम फेरी:शमीना रियाझ(तामिळनाडू)वि.वि.रुद्र सिंग(महा)11-8 11-9 12-10;
35 वर्षांवरील: अंतिम फेरी: संदीप जांगरा(सर्व्हिसेस)वि.वि.अर्जुन अग्निहोत्री(सर्व्हिसेस)(1)11-6 11-3 11-1;
40 वर्षांवरील: पॉल इपे(केरळ)वि.वि.संजय पवार(महा)(1)11-9 9-11 11-3 1-11 11-3;
45 वर्षावरील: बेंजामिन नेदारापल्ली(महा)वि.वि.रणवीर सिंग(दिल्ली)5-11 11-5 11-8 11-4;
50 वर्षांवरील: विकास नायर(चंडीगड)वि.वि.संजय राजपाल(कर्नाटक)(1)9-11 11-1 13-11 11-8;
55 वर्षांवरील: इंद्रजीत सिंग(महा)वि.वि.राज दुबे(महा)(5)4-11 11-6 11-5 11-2;
60 वर्षांवरील: अजय कोहली(दिल्ली)वि.वि.आशुन बहल(महा)(3)11-7 12-10 9-11 11-7;
65 वर्षांवरील: विजय जैनी(हरियाणा)(1)वि.वि.किशन लाल(महा)10-12 11-3 11-1 12-10 .