आयपीएल 2024 च्या 65व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्स समोर पंजाब किंग्जचं आव्हान आहे. हा सामना आसामच्या गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टिरक्षक), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युझवेंद्र चहल
इम्पॅक्ट प्लेअर्स – नांद्रे बर्गर, तनुष कोटियन, केशव महाराज, कुलदीप सेन, डोनोवन फरेरा
पंजाब किंग्ज – प्रभसिमरन सिंग, जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंह, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), सॅम करन (कर्णधार), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, नॅथन एलिस, राहुल चहर, अर्शदीप सिंग
इम्पॅक्ट प्लेअर्स – तनय त्यागराजन, ऋषी धवन, विद्वत कवेरप्पा, आशुतोष शर्मा, हरप्रीत सिंग भाटिया
राजस्थानचा संघ प्लेऑफसाठी आधीच क्वालिफाय झाला आहे. आता ते अव्वल दोन क्रमांकावर आपलं स्थान निश्चित करण्यासाठी उत्सुक असतील. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघ 12 सामन्यांत 8 विजयानंतर गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. त्यांचे 16 गुण आहेत. दुसरीकडे, या हंगामात पंजाब किंग्जचं आव्हान आधीच संपुष्टात आलं आहे. पंजाब गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे. त्यांनी 12 पैकी केवळ 4 सामन्यांमध्ये विजय प्राप्त केला आहे. पंजाबच्या नावे 8 गुण आहेत.
राजस्थानसाठी वाईट बातमी म्हणजे, संघाचा स्टार फलंदाज जोस बटलर पाकिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी मायदेशी रवाना झाला आहे. तर पंजाबकडून आक्रमक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन देखील दुखापतीमुळे इंग्लडला परतला आहे.
राजस्थानचा युवा फलंदाज रियान पराग मुळचा आसामचा आहे. आजचा सामना त्याच्या घरच्या मैदानावर असल्यानं रियानच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल. या मोसमात त्यानं संघासाठी जबरदस्त फलंदाजी केली आहे. रियाननं आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांमध्ये 60.75 च्या सरासरीनं 483 धावा केल्या. या दरम्यान त्याचा स्टाइक रेट 153.82 एवढा राहिला.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई इंडियन्सनं रिटेन नाही केलं तर रोहित शर्मा कोणत्या टीममध्ये जाणार? हिटमॅनकडे आहेत ‘हे’ पर्याय
जोस बटलर तर गेला, आता सलामीवीर म्हणून कोण खेळणार? राजस्थान रॉयल्सकडे आहेत ‘हे’ 3 पर्याय
आरसीबी विरुद्ध सीएसके सामन्याला बसणार पावसाचा फटका! 18 मे रोजी बंगळुरूचं हवामान कसं असेल? जाणून घ्या