घरच्या मैदानावर दणदणीत पराभव झाल्यानंतर आता गुजरात टायटन्सची टीम आरसीबीचा सामना करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचली आहे. आयपीएल 2024 चा 52 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स होणार आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल.
गेल्या सामन्यात गुजरातचं गोलंदाजी आक्रमण विराट कोहली आणि विल जॅक्सच्या झंझावातानं उद्ध्वस्त झालं होतं. अशा परिस्थितीत शुबमन गिलचा संघ या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. या रोमांचक सामन्यात असे अकरा खेळाडू कोणते असतील, जे ड्रीम-11 मध्ये तुम्हाला पैसे कमावून देऊ शकतात, ते या बातमीद्वारे जाणून घ्या.
या सामन्यात विकेटकीपरसाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. पहिला वृद्धिमान साहा आणि दुसरा दिनेश कार्तिक. साहा डावाची सुरुवात करेल म्हणजेच पॉवरप्लेमध्ये खेळेल. परंतु गुजरातच्या या सलामीवीराचा फॉर्म चांगला नाही. अशा परिस्थितीत दिनेश कार्तिक हा एक चांगला पर्याय असेल.
फलंदाजीत विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, रजत पाटीदार, डेव्हिड मिलर आणि शुबमन गिल, साई सुदर्शन हे सर्वोत्तम पर्याय असतील. कोहलीचा अलीकडचा फॉर्म अप्रतिम आहे. गुजरातविरुद्ध खेळलेल्या गेल्या सामन्यात विराटनं नाबाद 70 धावा केल्या होत्या. त्याचवेळी शुबमन गिल चिन्नास्वामीच्या छोट्या मैदानावर खळबळ माजवू शकतो. साई सुदर्शननं या स्पर्धेत गुजरातकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत.
अष्टपैलू खेळाडू म्हणून विल जॅक्स हा सर्वात मजबूत पर्याय असेल. गुजरातविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात जॅक्सनं स्फोटक शतक झळकावलं होतं. त्यानं शेवटच्या दोन षटकांत ५७ धावा ठोकल्या होत्या. बॅटसोबतच जॅक्स तुम्हाला बॉलनंही पॉइंट्स देऊ शकतो. जर तुम्ही संघ योग्य मॅनेज केला असेल तर तुम्ही कॅमेरून ग्रीनला देखील ठेवू शकता.
गोलंदाजीत मोहम्मद सिराज, यश दयाल आणि राशिद खान हे त्रिकूट तुम्हाला चांगले गुण देऊ शकतात. सिराज फॉर्ममध्ये परतला असून गेल्या सामन्यात त्यानं चेंडूनं कहर केला होता. त्याच वेळी राशिद खानकडे मोठ-मोठ्या फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची कला आहे.
बंगळुरू विरुद्ध गुजरात ड्रीम 11 टीम
यष्टिरक्षक – दिनेश कार्तिक
फलंदाज – फाफ डू प्लेसिस, विराट कोहली (कर्णधार), रजत पाटीदार, डेव्हिड मिलर, शुबमन गिल (उपकर्णधार), साई सुदर्शन
अष्टपैलू – विल जॅक्स
गोलंदाज– मोहम्मद सिराज, यश दयाल, राशिद खान
महत्त्वाच्या बातम्या –