आयपीएल 2024 मध्ये रविवारी (12 मे) झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं दिल्ली कॅपिटल्सवर 47 धावांनी विजय मिळवला. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीनं चमकदार कामगिरी केली. या विजयामुळे आरसीबीचे 12 गुण झाले असून संघाच्या ‘प्ले-ऑफ’च्या आशा अजूनही जिवंत आहेत.
या विजयानंतर आरसीबीनं गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली. 13 सामन्यात आरसीबीचे 6 विजय आणि 7 पराभव आहेत. आरसीबीचा पुढील सामना गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असलेल्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आहे. चेन्नईचे 13 सामन्यांमध्ये 14 गुण आहेत. अशा परिस्थितीत जर हा सामना आरसीबीनं चांगल्या फरकानं जिंकला तर संघाचं प्ले-ऑफचं तिकीट पक्कं होऊ शकतं. हा सामना जिकून आरसीबी प्लेऑफमध्ये कशी पोहचू शकते, हे आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगणार आहोत.
जर या सामन्यात आरसीबीची प्रथम फलंदाजी आली, तर संघाला चेन्नईच्या रनरेटला मागे टाकण्यासाठी सामना 18 धावांनी जिंकावा लागेल. जर आरसीबी या सामन्यात धावांचा पाठलाग करत असेल, तर संघाला चेन्नईनं दिलेलं लक्ष्य 18.1 षटकांत गाठावं लागेल. परंतु जर आरसीबी हा सामना हारली, तर त्यांचा प्लेऑफचा रस्ता बंद होईल आणि चेन्नईची टीम प्लेऑफमध्ये प्रवेश करेल.
रविवारच्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलनं नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजीला पाचारण केलं. आरसीबीने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 187 धावा केल्या. संघाकडून रजत पाटीदारनं 32 चेंडूत धमाकेदार 52 धावांची खेळी केली. सलामीला आलेल्या विराट कोहलीनं 13 चेंडूत 27 तर विल जॅक्सनं 29 चेंडूत 41 धावा केल्या. दिल्लीकडून खलिल अहमद आणि रसिख सलाम यांनी 2-2 बळी घेतले.
188 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या संघाची सुरुवात खराब झाली. त्यांचे फलंदाज निरंतर अंतरानं बाद होत गेले. कर्णधार अक्षर पटेलनं 39 चेंडूत सर्वाधिक 57 धावा केल्या. तर शाई होपनं 29 आणि जेक फ्रेसर मॅकगर्कनं 21 धावांचं योगदान दिलं. आरसीबीकडून यश दयालनं 20 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
आरसीबीचा सलग 5वा विजय, टॉप 5 मध्ये मारली धडक! प्लेऑफच्या आशा अजूनही कायम
विराट एवढा निष्ठावंत कोणीच नाही! एकाच संघाकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा केला विश्वविक्रम
आधी विराटनं चौकार-षटकार लगावत छेडलं, मग इशांत शर्मानं घेतला बदला; दोघांचा मजेशीर व्हिडिओ एकदा पाहाच