---Advertisement---

आधी विराटनं चौकार-षटकार लगावत छेडलं, मग इशांत शर्मानं घेतला बदला; दोघांचा मजेशीर व्हिडिओ एकदा पाहाच

---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल 2024 चा 62वा सामना खेळला गेला. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात इशांत शर्मा आणि विराट कोहली यांच्यात एक मजेदार प्रसंग घडला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या सामन्यात इशांत शर्मानं विराट कोहलीला त्याच्या आयपीएल कारकिर्दीत पहिल्यांदाच बाद केलं. यानंतर इशांतचं सेलिब्रेशन पाहून सर्वांनाच हसू फुटलं. या सामन्यात विराट कोहली स्फोटक शैलीत फलंदाजी करत होता. त्यानं केवळ 13 चेंडूत 27 धावा केल्या. आपल्या या खेळीत त्यानं 1 चौकार आणि 3 षटकार लगावले. विराट कोहली आणि इशांत शर्मा हे बालपणीचे मित्र आहेत. ते मैदानावर अनेकदा विनोद करताना दिसतात.

ही घटना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या डावातील चौथ्या षटकात घडली. ओव्हरचा पहिला चेंडू कोहलीच्या बॅटला चाटून थर्ड मॅनच्या दिशेनं चौकाराला गेला. या चौकारानंतर विराट इशांतला मजेशीर पद्धतीनं चिडवताना दिसला. विराटनं पुढच्या चेंडूवर इशांतला जोरदार षटकार लगावला. यानंतर त्यानं पुन्हा एकदा इशांतकडे बोट दाखवून इशारा केला.

इशांतनं ओव्हरच्या पहिल्या 3 चेंडूत 1 षटकार आणि एका चौकारासह 11 धावा दिल्या होत्या. त्यानं चौथा चेंडू फुल लेंथवर टाकला, ज्यावर कोहलीनं फ्रंटफूटवर येऊन शॉट खेळला. मात्र चेंडू त्याच्या बॅटची कड चाटून गेला आणि अभिषेक पोरेलनं यष्टिमागे त्याचा सोपा झेल घेतला. कोहलीचा डाव 27 धावांवर संपला. विराट कोहलीची विकेट घेतल्यानंतर इशांत शर्मानं त्याला चिडवण्यासाठी त्याच्या जवळ जाऊन हलकासा धक्का दिला. यावेळी विराट कोहली देखील मान खाली घालून हसताना दिसला.

 

विराट कोहलीनं या सामन्यात एक नवा इतिहास रचला आहे. तो आयपीएलमध्ये एका संघासाठी 250 सामने खेळणारा पहिला खेळाडू बनला. तसेच आयपीएलच्या इतिहासात 250 सामने खेळणारा तो केवळ चौथा खेळाडू आहे. त्याच्या आधी महेंद्रसिंह धोनी (263), रोहित शर्मा (256) आणि दिनेश कार्तिक (255) यांनी आयपीएलच्या इतिहासात 250 किंवा त्याहून अधिक सामने खेळले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

रवींद्र जडेजाला हुशारी पडली महागात, राजस्थानविरुद्ध क्रिकेटच्या ‘या’ नियमामुळे झाला बाद; जाणून घ्या

चेपॉकच्या संथ खेळपट्टीवर ऋतुराज गायकवाडची कमाल, चेन्नईचा राजस्थानवर शानदार विजय

चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीसमोर दिल्लीचं आव्हान, टॉस जिंकून दिल्लीची गोलंदाजी; प्लेइंग 11 जाणून घ्या

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---