आयपीएल 2024 च्या 62व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर दिल्ली कॅपिटल्सचं आव्हान आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स – जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल (यष्टिरक्षक), शाई होप, कुमार कुशाग्रा, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), कुलदीप यादव, रसिक दार सलाम, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद
इम्पॅक्ट प्लेअर्स – डेव्हिड वॉर्नर, सुमित कुमार, रिकी भुई, विकी ओस्तवाल, प्रवीण दुबे
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन
इम्पॅक्ट प्लेअर्स – स्वप्नील सिंग, अनुज रावत, सुयश प्रभुदेसाई, वैषाख विजयकुमार, हिमांशू शर्मा
दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीत असल्यानं चाहत्यांना आज चुरशीची स्पर्धा पाहायला मिळू शकते. दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार रिषभ पंतला स्लो ओव्हर रेट राखल्यामुळे एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळे तो आजच्या सामन्यात खेळू शकणार नाही. दिल्लीसाठी हा मोठा धक्का आहे. पंत न खेळल्याचा फायदा बंगळुरूला होईल. रिषभ पंतच्या जागी अष्टपैलू अक्षर पटेल दिल्लीचं नेतृत्व करतोय.
फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील बंगळुरू संघ गेल्या काही सामन्यांपासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गुजरात टायटन्सला दोनदा पराभूत करण्यासह, आरसीबीनं पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला आहे. आरसीबी 12 सामन्यांत 5 विजय आणि 7 पराभवांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्सनं 12 पैकी 6 सामने जिंकले असून 6 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
संजू सॅमसनच्या नावे आणखी एक विक्रम, आयपीएलमध्ये मोडला स्वत:चा रेकॉर्ड