आयपीएल 2024 मध्ये आजचा 30वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. आरसीबीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस – आम्ही धावांचा पाठलाग करणार आहोत. आम्ही आमचं सर्वोत्तम क्रिकेट खेळलेलं नाही. असं वाटतं की बहुतेक वेळा आम्ही आमच्या पूर्ण क्षमतेनं खेळलो नाही. आम्ही ते बदलू शकतो का हे पाहण्यासाठी संघात बदल केले आहेत. मॅक्सवेल आणि सिराज बाहेर गेले आहेत. फर्ग्युसन संघात येतोय.
हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स – आम्ही काही उत्कृष्ट विजय मिळवले आहेत. टी20 क्रिकेटमध्ये प्रत्येक सामना जिंकता येत नाही. आमच्या संघात कोणताही बदल नाही. चिन्नास्वामीवर तुम्हाला कधीच माहित नसतं की योग्य स्कोर काय आहे. 240 हा स्कोर पुरेसा राहू शकतो.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, सौरव चौहान, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, विजयकुमार वैशाख, रीस टॉपली, लोकी फर्ग्युसन, यश दयाल
इम्पॅक्ट प्लेअर्स – सुयश प्रभुदेसाई, अनुज रावत, स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा
सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन
इम्पॅक्ट प्लेअर्स – उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडे, ग्लेन फिलिप्स, राहुल त्रिपाठी
फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी 6 सामन्यांमध्ये केवळ एका विजयानंतर गुणतालिकेत तळाशी आहे. संघाला गेल्या चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. आज जर आरसीबी विजयी मार्गावर परतली नाही, तर त्यांच्यासाठी प्लेऑफचा मार्ग कठीण होईल.
दुसरीकडे, पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. हैदराबादनं 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला असून 2 सामने गमावले आहेत. संघानं गेल्या सामन्यात पंजाबविरुद्ध दोन धावांनी रोमहर्षक विजय मिळवला होता.
दोन्ही संघांच्या हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, बंगळुरू आणि हैदराबाद एकूण 23 वेळा आमनेसामने आले आहेत. या पैकी आरसीबीनं 10 सामने जिंकले असून हैदराबादनं 12 सामन्यात विजय मिळवला आहे. एक सामना अनिर्णित राहिला.
महत्त्वाच्या बातम्या –