इंडियन प्रीमिअर लीग इतिहासातील सर्वात मोठा ट्रेड पाहायला मिळाला आहे. आयपीएल 2024 स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्या याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड करत संघात घेतले. त्यानंतर गुजरातने आयपीएल 2024साठी आपला कर्णधार म्हणून शुबमन गिल याच्या नावावर शिक्कामोर्तब केले. अशात, कर्णधारपदाची जबाबदारी खांद्यावर येताच गिलने मोठे विधान केले आहे.
काय म्हणाला गिल?
कर्णदारपदाची जबाबदारी मिळताच शुबमन गिल (Shubman Gill) म्हणाला की, “मला गुजरात टायटन्सचे कर्णधारपद स्वीकारताना आनंद आणि अभिमान वाटत आहे. इतक्या चांगल्या संघाचे नेतृत्व करण्यासाठी माझ्यावर विश्वास दाखवण्यासाठी मी फ्रँचायझीला धन्यवाद देतो. आमचे दोन हंगाम शानदार राहिले आहेत. मी क्रिकेटच्या आमच्या रोमांचक ब्रँडसह संघाचे नेतृत्व करण्यासाठी उत्सुक आहे.”
गिलची गुजरातकडून कामगिरी
आयपीएल 2022मध्ये आपल्या पहिल्या हंगामात विजेतेपद पटकावल्यानंतर गुजरात टायटन्स (Gujarat Titans) पुढील हंगामाच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून पराभूत झाला होता. गुजरातकडून खेळताना गिलने 33 डावात 47.34च्या सरासरीने 3 शतके आणि 8 अर्धशतकांच्या मदतीने 1373 धावा केल्या आहेत. मागील हंगाम त्याच्यासाठी यादगार राहिला होता. कारण, त्याने 17 सामन्यात 59.33च्या सरासरीने 3 शतके आणि 4 अर्धशतकांचा पाऊस पाडला होता. यासोबतच त्याने 890 धावाही केल्या होत्या. यामुळे ऑरेंज कॅपही त्याने पटकावली होती.
गिलने आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामात 3 शतकेही झळकावली होती. विशेष म्हणजे, एका हंगामात त्याच्यापेक्षा जास्त शतके फक्त रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा फलंदाज विराट कोहली (2016) आणि राजस्थान रॉयल्स संघाचा फलंदाज जोस बटलर (2022) यांनी केली आहेत. दोघांनी एका आयपीएल हंगामात प्रत्येकी 4 शतके केली आहेत.
हार्दिक मुंबईच्या ताफ्यात
गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यातील ट्रेडनंतर गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) त्याची पहिली फ्रँचायझी मुंबई इंडियन्स संघात परतला आहे. पंड्याने गुजरातसोबत दोन आयपीएल हंगाम खेळले. गुजरातच्या 2022च्या पहिल्याच हंगामात हार्दिकने शानदार सुरुवात करत संघाला ट्रॉफी जिंकून दिली होती. (ipl 2024 shubman gill named gujarat titans captain as hardik pandya returns to mi 2023 his statement viral)
हेही वाचा-
IPL ब्रेकिंग! पंड्या मुंबईकडे जाताच Gujarat Titansचे कर्णधारपद ‘या’ पठ्ठ्याकडे, उंचावतील तुमच्याही भुवया
BREAKING: अखेर हार्दिक पंड्या मुंबईच्या ताफ्यात, स्वत: IPLने दिली अधिकृत माहिती