आयपीएल २०२४ साठी दुबईत खेळाडूंचा लिलाव पार पडला होता. यामध्ये लिलावाच्या रिंगणात एकूण ३३३ खेळाडू होते, ज्यातील काहींना आयपीएल २०२४ चा भाग होण्याची संधी मिळाली. तर, काही खेळाडू जगातील लोकप्रिय ट्वेंटी-२० लीगपासून दूर राहिले. आयपीएल २०२४ च्या मिनी लिलावात एकूण ५६ खेळाडूंची खरेदी झाली. ज्यामध्ये २३ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
तसेच १० फ्रँचायझींनी २,१२,६०,००,००० एवढी रक्कम खर्च केली. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवर ऐतिहासिक बोली लागली. खरं तर स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला असून, त्याला केकेआरच्या फ्रँचायझीने २४.७५ कोटीत आपल्या ताफ्यात घेतले आहे.
अशातच, इंडियन प्रीमियर लीग मार्चच्या अखेरीस सुरू होण्याची दाट शक्यता आहे. याआधीही भारतीय माजी दिग्गज सलामीवीर फलंदाज सुनील गावस्कर यांनी एक भविष्यवाणी केली आहे. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर त्यानी आयपीएल २०२४ साठी प्लेऑफसाठी संघ पात्र ठरविण्याबाबत भाष्य केले आहे.
याबरोबरच, भारतीय माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) पुन्हा एकदा इंडियन प्रीमियर लीगच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी एक प्रबळ दावेदार म्हंटले आहे. तसेच, चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या14 हंगामात 12 वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे आणि आयपीएल ट्रॉफीसाठी प्रत्येक सीझनसाठी प्रबळ दावेदार म्हणून त्यांचे स्थान मजबूत केले आहे.
एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघ सीएसकेने गेल्या मोसमात पाच विजेतेपदांसह स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक जेतेपदे जिंकण्याच्या मुंबई इंडियन्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्जने डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र आणि मुस्तफिजुर रहमान, शार्दुल ठाकूर, समीर रिझवी,अवनीश राव अरावली यांचा समावेश गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या मिनी-लिलावात संघात केला आहे.
दरम्यान, भारतीय माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी म्हंटले आहे की, ते कव्हर आहेत कारण त्यांच्याकडे पर्याय आहेत. शार्दुल ठाकूर पुन्हा सामील झाल्याने दीपक चहर संपूर्ण स्पर्धा खेळणार की नाही ही चिंता दूर झाली आहे, कारण शार्दुल ठाकूर त्याची जागा घेऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या –
Team India । संघातील दुखापतींचे सत्र सुरूच, तिसऱ्या कसोटीआधी महत्वाचा फलंदाज माघार घेणार!
IND vs ENG । ‘हे’ दोघे नव्या युगातील भारताचे स्टार फलंदाज! इंग्लिश दिग्गजाचा मोठा दावा