आयपीएलचा 17वा हंगाम सुरू होण्यासाठी आता फक्त काहीच तासांचा कालावधी शिल्लक आहे. त्यासाठी आता सर्व संघानी कंबर कसली आहे. तसेच 22 मार्चला पहिला सामना माहीच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच चेपॉकवर होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात विजयाचा श्रीगणेशा कोण करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
याबरोबरच महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वातील चेन्नईची टीम यंदा देखील आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या टीमला आतापर्यंत एकाही आयपीएलमध्ये विजेतेपद जिंकता आलेलं नाही. त्यामुळे यंदाच्या 17 व्या सीझनमध्ये विजेतेपद पटकावण्याच्या इराद्यानं बंगळुरु देखील स्पर्धेची सुरुवात विजयानं करण्याचा प्रयत्नात असणार आहे. तसेच पहिला सामना चेन्नई येथील चेपॉक स्टेडियम होणार आहे. तर या मैदानावर दोन्ही संघांचा रेकॉर्ड कसा आहे. याबद्दल आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत.
आयपीएलच्या इतिहासात आत्तापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये 31 मॅच झालेल्या आहेत. तर या सामन्यांचं रेकॉर्ड पाहिलं असता चेन्नईनं 20 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. तर, आरसीबीनं 10 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. तसेच दोन्ही टीममधील एक मॅच अनिर्णित देखील राहिली होती.
अशातच चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 8 मॅच झालेल्या आहेत. यापैकी 7 मॅचमध्ये चेन्नईनं विजय मिळवत आरसीबीला पराभूत केलं आहे. तर आरसीबीला 2008 नंतर चेपॉकवर विजय मिळवता आलेला नाही. तसेच चेन्नईचं होम ग्राऊंड असलेल्या चेपॉकवर सीएसके आणि आरसीबी यांच्यात 2023 च्या आयपीएलमध्ये लढत झाली होती. या लढतीत चेन्नईनं 6 विकेट गमावून 226 धावा केल्या होत्या. त्या मॅचमध्ये डिवोन कॉन्वेनं 83, शिवम दुबेनं 52 धावा केल्या होत्या. फाफ डु प्लेसिसच्या 62 आणि ग्लेन मॅक्सवेलच्या 76 धावांची खेळी वाया गेली होती. चेन्नईनं ती मॅच जिंकली होती.आरसीबीच्या टीमला यंदा चेपॉकवरील पराभवाची मालिका खंडीत करण्याची संधी चालून आली आहे.
CSK into the IPL Finals 💛.
RT if you are waiting for This Moment. #IPL #IPL2018 #SRHvCSK #CSK #IPLFinal pic.twitter.com/JFX7nroQxB— Chennai Super Kings Fans (@CskIPLTeam) May 22, 2018
दरम्यान, सीएसकेनं आतापर्यंत पाचवेळा आयपीएलच्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये धोनीच्या टीमनं विजय मिळवला होता. यंदा धोनीच्या टीमकडे सहाव्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आतापर्यंत एकाही स्पर्धेत विजेतेपद पटकावता आलेलं नाही. आरसीबीनं 2009, 2011 आणि 2016 ला अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र, त्यांना उपविजेतपदावर समाधान मानावं लागलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-
- दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूची अयोध्येतील राम मंदिरात पूजा, सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल
- IPL 2024 साठी एबी डिव्हिलियर्सचं भाकीत, म्हणाला, ‘हा’ भारतीय खेळाडू करेल दमदार कामगिरी