इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) 18 वा सीझन म्हणजेच 2025 मध्ये खेळला जाणारा आयपीएल चाहत्यांसाठी खूप रंजक असणार आहे. कारण अनेक मोठे खेळाडू इतर संघांचा भाग असतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. 31 ऑक्टोबर रोजी सर्व 10 आयपीएल फ्रँचायझींनी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली. त्यानंतर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने मेगा लिलावाच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. ज्याचे आयोजन 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियामधील जेद्दाह या अरबी शहरात होणार आहे. यावेळी एकूण 1574 खेळाडूंनी आयपीएल मेगा लिलावासाठी आपली नावे नोंदवली असून त्यापैकी 1165 भारतीय खेळाडू आहेत.
आयपीएलने अधिकृतपणे जाहीर केलेल्या माहितीमध्ये, मेगा प्लेयर ऑक्शनसाठी 48 भारतीय खेळाडू आहेत. ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. ज्यामध्ये रिषभ पंत, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. याशिवाय 152 भारतीय खेळाडू आहेत. ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नाही. पण आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. याशिवाय 965 भारतीय अनकॅप्ड खेळाडू आहेत. ज्यांनी अद्याप आयपीएलमध्ये पदार्पण केलेले नाही. अशा परिस्थितीत, मेगा लिलावात सहभागी होण्यासाठी एकूण 1165 भारतीय खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. यापैकी ही यादी आता सर्व फ्रँचायझींकडे सोपवली जाईल, त्यानंतर मेगा लिलावापूर्वी अंतिम यादी जाहीर केली जाईल. ज्यामध्ये किती खेळाडूंवर बोली लावली जाईल याचा निर्णय घेतला जाईल.
यावेळी, 16 विविध देशांतील 409 खेळाडूंनी आयपीएल मेगा लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नावे नोंदवली आहेत, त्यापैकी 272 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. याशिवाय, असे फक्त 3 खेळाडू आहेत. जे गेल्या आयपीएलचा भाग होते परंतु त्यांनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही सामना खेळलेला नाही. यामध्ये 104 अनकॅप्ड परदेशी खेळाडूंचा समावेश आहे, जे आधी आयपीएलचा भाग नव्हते किंवा त्यांनी अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नाही.
हेही वाचा-
आयपीएल मेगा लिलावापूर्वीच श्रेयस अय्यरचा वाढला ‘भाव’, अनेक फ्रँचायझींकडून मिळतेय खास ऑफर
“तू नेहमीच माझा कर्णधार…” श्रेयस अय्यर नाही, तर शाहरूख खानला आठवतोय ‘हा’ दिग्गज
आयपीएलच्या मेगा लिलावात उतरणार 1500 पेक्षा जास्त खेळाडू, तारिख आणि ठिकाणही समोर