आयपीएल 2025 मेगा लिलावाचा आज (25 नोव्हेंबर) दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी एकूण 84 खेळाडूंवर बोली लागली. त्यापैकी 72 खेळाडू विकले गेले तर 12 खेळाडू अनसोल्ड राहिले. लिलावासाठी एकूण 577 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी 493 खेळाडूंच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. पहिल्या दिवशी लिलावात केवळ 84 खेळाडूंचीच नावे आली असतील, तर उर्वरित 493 खेळाडूंवर दुसऱ्या दिवशी बोली कशी लागणार? या संभ्रमात चाहते आहेत. तर तुमच्या माहितीसाठी सांगायचे झाल्यास, दुसऱ्या दिवशी एक वेगवान लिलाव होईल ज्यामध्ये संघांना त्यांच्या आवडत्या खेळाडूंची ठरावीक क्रमांकाद्वारे निवड करण्यास सांगितले जाईल. त्यानंतर संघांनी निवडलेल्याच खेळाडूंवर बोली लागेल.
या पध्दतीने लिलाव वेगवान करण्याची प्रक्रिया आहे. त्याचा फायदा म्हणजे लिलावात सर्वच खेळाडूंची नावे घेतली जाणार नाहीत. ठराविक क्रमांकानुसार संघ उर्वरित खेळाडूंमधून त्यांच्या आवडत्या खेळाडूंची यादी तयार करतील. त्यानंतर त्या खेळाडूंवरच बोली लावली जाईल.
उर्वरित 85 ते 577 खेळाडू आज दुसऱ्या दिवशी आयपीएल लिलावाच्या यादीत सादर केले जातील. 116व्या खेळाडूपर्यंत ही प्रक्रिया जेद्दाहमधील लिलावाच्या पहिल्या दिवसाप्रमाणेच राहील. त्यानंतर वेगवान लिलाव होईल.
प्रवेगक लिलावाचे दोन भाग असतील. पहिल्या भागात, सर्व फ्रँचायझींना त्यांच्या पसंतीचे खेळाडू 117 ते 577 खेळाडूंमध्ये शॉर्टलिस्ट करण्यास सांगितले जाईल जे वेगवान लिलाव प्रक्रियेदरम्यान ऑफर केले जातील.
आयपीएल लिलावाच्या दुसऱ्या दिवशी फाफ डू प्लेसिस, अजिंक्य रहाणे, मार्को जेन्सन, पृथ्वी शॉ, केन विल्यमसन, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांसारखे प्रसिद्ध खेळाडू असतील.
हेही वाचा-
हे आहेत भारताचे कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठे विजय, टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियात नवा विक्रम रचणार
आयपीएल चॅम्पियन कर्णधाराला खरेदीदार सापडला नाही, हे स्टार खेळाडूही अनसोल्ड!
मुंबई इंडियन्सने हिऱ्यासारखा खेळाडू गमावला! यामुळे सुवर्णसंधी वाया गेली