आयपीएल 2025 हंगामासाठी बीसीसीआयने काही नवे नियम लागू केले आहेत. हे बदल खेळ अधिक संतुलित आणि रोमांचक करण्यासाठी करण्यात आले आहेत. ज्यातील काही नियम संघासाठी व कर्णधारांसाठी दिलासादायक आहेत. चला तर आयपीएल 2025 साठी बीसीसीआयने कोणते नवीन नियम लादले आहेत ते जाणून घेऊया.
दवच्या बचावसाठी दुसऱ्या डावात 2 चेंडू वापरण्याची परवानगी
दवमुळे दुसऱ्या डावात फलंदाजांना फायदा होतो आणि गोलंदाजांना त्रास होतो. यावर उपाय म्हणून 11व्या षटकानंतर दुसरा नवीन चेंडू वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय अंपायरांच्या अधिकारात असेल, ज्यामुळे सामन्याचे संतुलन राखले जाईल.
चेंडूवर लाळ लावण्यावरील बंदी उठवली आहे
कोविड-19 मुळे लागू केलेली लाळ वापरण्याची बंदी आता उठवण्यात आली आहे. यामुळे गोलंदाजांना चेंडू चमकवून अधिक स्विंग मिळवता येणार आहे. हा निर्णय पारंपरिक क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
स्लो ओव्हर रेटसाठी कर्णधारावर बंदी नाही
स्लो ओव्हर रेटसाठी कर्णधारांवर बंदी घालण्याऐवजी आर्थिक दंड किंवा संघासाठी पेनल्टी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे खेळाचा वेग राखण्यास मदत होईल.
इम्पॅक्ट प्लेअर नियम सुरू राहणार
गेल्या हंगामात लागू करण्यात आलेला “इम्पॅक्ट प्लेअर” नियम कायम ठेवण्यात आला आहे. यामुळे संघाला सामन्यादरम्यान एक अतिरिक्त खेळाडू बदलण्याची संधी मिळेल.
या नव्या नियमप्रणालीमुळे आयपीएल 2025 मध्ये मोठा फरक आणू शकते. चाहत्यांसाठी यामुळे अधिक चुरशीच्या सामन्यांचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे.






