आयपीएल 2025च्या 32व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा (DC vs RR Super Over) सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 188 धावा केल्या. प्रत्युत्तरात, राजस्थान संघाकडून यशस्वी जयस्वाल आणि नितीश राणा यांनी अर्धशतके झळकावली, परंतु त्यांचा संपूर्ण संघ निर्धारित 20 षटकांत केवळ 188 धावाच करू शकला. अशा परिस्थितीत, सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमधून लागला, ज्यामध्ये दिल्लीने राजस्थानचा 2 विकेट्सने पराभव केला.
189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाने चांगली सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार संजू सॅमसन यांच्यात एक मजबूत सलामी भागीदारी झाली, परंतु सॅमसन 31 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. यावेळी रियान परागला अक्षर पटेलने 8 धावांवर क्लीन बोल्ड झाला. यशस्वी जयस्वालने सलग दुसरे अर्धशतक झळकावले. तो 37 चेंडूत 51 धावा करून बाद झाला. यापूर्वी, जयस्वालने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात ७५ धावांची तुफानी खेळी खेळून खळबळ उडवून दिली होती.
राजस्थानने 112 धावांवर आपला दुसरा बळी गमावला, त्यानंतर नितीश राणा आणि ध्रुव जुरेल यांनी संघाची सूत्रे हाती घेतली. जेव्हा आरआरचा संघ सहज विजयाकडे वाटचाल करत होता, तेव्हा नितीश 51 धावांवर बाद झाला आणि सामना तिथेच अडकला. सामना अशा टप्प्यावर पोहोचला जेव्हा राजस्थानला शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता होती आणि मिशेल स्टार्क गोलंदाजी करत होता.
#TATAIPL 2025’s FIRST ???????????????????? ????????????????! ????????#DC and #RR give us yet another thriller. Who’s going to emerge victorious? ⚔
— Star Sports (@StarSportsIndia) April 16, 2025
Watch the LIVE action ➡ https://t.co/nbBEFOkjkM #IPLonJioStar ???? #DCvRR | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi & JioHotstar! pic.twitter.com/4umue0JfjQ
राजस्थानच्या हातात 7 विकेट शिल्लक होत्या, सेट फलंदाज ध्रुव जुरेल आणि डॅशिंग खेळाडू शिमरॉन हेटमायर क्रीजवर उपस्थित होते. पण दोघांनीही शेवटच्या षटकात सिंगल-डबल रणनीती अवलंबून आरआरसाठी समस्या निर्माण केली. त्यांनी आक्रमक फटकेबाजी केली नाही. शेवटच्या चेंडूवर 2 धावा हव्या होत्या, पण राजस्थान फक्त एकच धाव करु शकला आणि सामना बरोबरीत सुटला. विकेट्स शिल्लक असतानाही राजस्थानच्या फलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये खराब फलंदाजी केली. ज्यामुळे सामना टाय झाला. पुढे सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने सामना जिंकला.






