यंदाचा आयपीएल हंगाम भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेल्या तणावामुळे रद्द करण्यात आला होता. पण सोमवारी (12 मे) रात्री बीसीसीआयने आयपीएलबाबत नवीन माहिती दिली. आयपीएल 2025चा उर्वरित हंगाम (17 मे) पासून सुरू होणार आहे. तसेच बीसीसीआयने (BCCI) उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. पण प्लेऑफचे सामने कुठे खेळले जाणार याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. दरम्यान या सामन्यांबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार आयपीएल 2025चा क्वालिफायर 2 आणि फायनल सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे खेळवला जाईल.
???? IPL FINAL IN AHMEDABAD. ????
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 13, 2025
– Narendra Modi Stadium shortlisted to host Qualifier 2 and the Final. (Cricbuzz). pic.twitter.com/4i3nXqIlEj
आयपीएल 2025चा फायनल सामना (3 जून) रोजी खेळला जाणार आहे. तसेच काही सामने डबल हेडरमध्ये खेळवले जाणार आहेत. उर्वरित आयपीएलची स्पर्धा 6 ठिकाणांवर होणार आहे.
आयपीएल 2025 स्पर्धेतील उर्वरित सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक-
17 मे- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (बंगळुरू)
18 मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स (जयपुर)
18 मे – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स (दिल्ली)
19 मे – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (लखनऊ)
20 मे – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (दिल्ली)
21 मे- मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (मुंबई)
22 मे – गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (अहमदाबाद)
23 मे – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (बंगळुरू)
24 मे- पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (जयपूर)
25 मे – गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (अहमदाबाद)
25 मे- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (दिल्ली)
26 मे – पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (जयपुर)
27 मे- लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (लखनऊ)
29 मे – पहिला क्वालिफायर सामना
30 मे- एलिमिनेटर
1 जून – दुसरा क्वालिफायर सामना
3 जून – फायनल सामना






