यंदाच्या आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात मोठा धमाका होणार आहे. आयपीएल सुरू होण्यास फारसा वेळ शिल्लक नाही, त्यामुळे संघांची तयारी सुरू झाली आहे. आरसीबी आणि केकेआर संघ 22 मार्च रोजी पहिल्या सामन्यात एकमेकांसमोर येतील. हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. आयपीएलच्या इतिहासात हे दोन्ही संघ किती वेळा एकमेकांसमोर आले आहेत आणि कोणत्या संघाच पारड जड आहे ते पाहुया.
आयपीएलचा पहिला हंगाम 2008 मध्ये खेळवण्यात आला. त्यावेळी पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला होता. त्यानंतर, आता दोन्ही संघ आयपीएल हंगामाच्या पहिल्या सामन्यात पुन्हा एकमेकांसमोर येतील. शिवाय, तेव्हापासून बरेच काही बदलले आहे. यावेळी अजिंक्य रहाणे केकेआरचा कर्णधार असेल तर रजत पाटीदार आरसीबीचा कर्णधार असेल.
दोन्ही संघांच्या हेड टू हेड आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, आयपीएलच्या इतिहासात या दोन्ही संघात 34 सामने झाले आहेत. यापैकी आरसीबीने 14 सामने जिंकले आहेत, तर केकेआरने 20 वेळा विजय मिळवला आहे. आयपीएल 2025चा पहिला सामना कोलकाता येथे होणार आहे, त्यामुळे तिथली आकडेवारी देखील जाणून घेऊया. कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर दोन्ही संघांमध्ये 12 सामने झाले आहेत. ज्यात आरसीबीने चार वेळा आणि केकेआरने आठ वेळा सामना जिंकला आहे.
या आकडेवारीनुसार, केकेआरचा दबदबा दिसत असला तरी, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, त्यामुळे पहिल्या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणे रंजक राहील.
आरसीबी आयपीएल 2025 संघ: रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, जोश हेझलवूड, फिल साल्ट, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, रसिक दार, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, नुवान तुषारा, मनोज भंडागे, जेकब बेथेल, देवदत्त पडिकल, स्वस्तिक चिकारा, लुंगी न्गीडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी.
केकेआर आयपीएल 2025 संघ: अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, क्विंटन डी कॉक, रहमानउल्लाह गुरबाज, अंगकृष रघुवंशी, वेंकटेश अय्यर, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, अँरिक नोरखिया, हर्षित राणा, सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, स्पेन्सर जॉन्सन, लवनीथ सिसोदिया, अनुकुल रॉय, मोईन अली, उमरान मलिक.






