---Advertisement---

GT vs RR: ‘हा’ खेळाडू ठरला राजस्थानसाठी कर्दनकाळ, एकतर्फी सामना फिरवला!

On: गुरूवार, एप्रिल 10, 2025 7:03 AM
---Advertisement---

आयपीएल 2025च्या 23व्या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 58 धावांनी पराभव केला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्यांनी मोठा विजय मिळवला. या हंगामात पाच सामन्यांमधील हा त्याचा चौथा विजय आहे. यासह संघाने पॉइंट्स टेबलमध्ये पहिले स्थान मिळवले आहे. राजस्थानचा हा 5 सामन्यांतील तिसरा पराभव आहे. राजस्थान पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे.

साई सुदर्शन गुजरातच्या विजयाचा नायक होता. त्याने 53 चेंडूत 82 धावा केल्या. सुदर्शनने 8 चौकार आणि 3 षटकार मारले. या हंगामातील हे त्याचे तिसरे अर्धशतक आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने 5 सामन्यात 273 धावा केल्या आहेत. साई सुदर्शन व जोस बटलर यांच्यातील भागीदारीने गुजरात मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. दोघांनी मिळून 80 धावांची भागीदारी केली. पण 94 धावांवर संघाला जोस बटलरच्या रुपाने दुसरा धक्का बसला. तो 36 धावा काढून बाद झाला. यानंतर शाहरुख खान (36) राहुल तिवेटिया (24) आणि रशिद खान (12) यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर गुजरातने 20 षटकात 217 धावा केल्या.

218 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने नियमित अंतराने विकेट गमावल्या. संघासाठी फक्त 3 फलंदाज दुहेरी अंकाचा टप्पा ओलांडू शकले. शिमरॉन हेटमायरने 32 चेंडूत 52 धावा, संजू सॅमसनने 28 चेंडूत 41 धावा आणि रियान परागने 14 चेंडूत 26 धावा केल्या. या तिघांना वगळता सर्व फलंदाज अपयशी ठरले. यशस्वी जयस्वाल 6, ध्रुव जुरेल 5 आणि नितीश राणा 1 धावा करून बाद झाले. शुभम दुबेलाही फक्त एक धाव करता आली. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. रशीद खान आणि आर साई किशोर यांना 2-2 यश मिळाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---