आयपीएल 2025 पूर्वी केवळ खेळाडूच नाही तर कोचींग स्टाफबाबतही मोठी चर्चा सुरु आहे. नुकतेच राजस्थान राॅयल्सने राहुल द्रविडला संघाचा हेड कोच म्हणून नियुक्ती केली. तत्तपूर्वी लखनऊ सुपर जायट्ंसने देखील संघाच्या मेंटाॅरपदी झहीर खानची नियुक्ती केली होती. ज्याप्रमाणे खेळाडू मेगा लिलावापूर्वी एका संघातून दुस-या संघात जाऊ शकतात, त्याचप्रमाणे कोचिंग स्टाफचे सदस्य देखील एका संघातून दुसऱ्या संघात जाऊ शकतात. दरम्यान आता अशी बातमी समोर आली आहे की राजस्थान रॉयल्सचा संघ संचालक कुमार संगकारा कोलकाता नाईट रायडर्समध्ये गौतम गंभीरची जागा घेऊ शकतो.
स्पोर्ट्स टुडेच्या बातमीनुसार, संगकारा कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक बनण्यासाठी चर्चा करत आहे. संगकारा केकेआरचा मेंटर झाला तर तो गौतम गंभीरची जागा घेईल. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर गंभीरला केकेआर सोडावे लागले. 2024 मध्ये गंभीरकडे कोलकाताचा मेंटॉर म्हणून पाहिले जात होते. आता 2025 मध्ये कुमार संगाकर केकेआरचा मेंटर म्हणून दिसू शकतो.
अहवालात असेही समोर आले आहे की श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकाराला राजस्थान रॉयल्सपासून वेगळे व्हायचे आहे आणि इतर संघांच्या ऑफरकडे पाहायचे आहे. मात्र, या प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता असा बदल प्रत्यक्षात होतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सने चांगली कामगिरी केली आणि प्लेऑफसाठी पात्र ठरले. संघाने 14 पैकी 8 सामने जिंकून तिसरे स्थान पटकावले. मात्र, सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या क्वालिफायर सामन्यात संघाला हार पत्करावी लागली. क्वालिफायरपूर्वी संघाने एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला होता. राजस्थानने बंगळुरूविरुद्ध 4 विकेट्सनी विजय मिळवला होता.
हेही वाचा-
Paralympics 2024; नवव्या दिवशी भारताच्या खात्यात येऊ शकतात 5 पदके, या खेळातून आशा
लय भारी! पॅरालिम्पिकच्या इतिहासात ज्युदोमध्ये भारताचे पहिलेच पदक
‘तो सर्व काही ऐकत राहिला कारण..’, केएल राहुल-संजीव गोयंका वादावर मोठा खुलासा