आयपीएल 2025 च्या 30 व्या सामन्यात, चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने लखनऊ सुपर जायंट्स (LSG) चा पराभव केला. यासह, चेन्नईने आयपीएलच्या 18 व्या हंगामात सलग पराभवांची मालिका खंडित केली. लखनऊच्या एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने यजमान लखनऊचा 5 गडी राखून पराभव केला. अशाप्रकारे, सलग 5 पराभवांनंतर चेन्नईला पहिला विजय मिळाला. या हंगामात सीएसकेचा हा फक्त दुसरा विजय आहे.
टाॅस गमावून पहिल्या डावात खेळताना लखनऊने कर्णधार रिषभ पंतच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 7 विकेट्स गमावून 166 धावा केल्या. पंतने 49 चेंडूत 63 धावांची खेळी केली. सुरुवातीच्या काही संघर्षानंतर पंतला त्याची लय मिळाली आणि नंतर अब्दुल समद (20 धावा) सोबत त्याने पाचव्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे लखनऊने घरच्या मैदानावर 166 धावांचा सन्मानजनक धावसंख्या उभारली.
लखनऊच्या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईने चांगली सुरुवात केली. संघाने 5 षटकांत 50 धावांचा टप्पा ओलांडला पण शेख रशीदची विकेट गमावली. रशीदने 27 धावा केल्या. 37 धावा काढल्यानंतर 8व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रचिन रवींद्र पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर चेन्नईचा मधला क्रम डळमळीत झाला. राहुल त्रिपाठी (9) आणि रवींद्र जडेजा (7) स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. विजय शंकरही फक्त 9 धावा काढून दिग्वेश राठीचा बळी ठरला.
यानंतर, धोनी क्रीजवर आला आणि त्याने शिवम दुबेसोबत जबाबदारी घेतली. जलद गतीने अर्धशतकी भागीदारी केली आणि शेवटी त्याच्या संघाला विजय मिळवून दिला. धोनीने 11 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकारासह 26 धावांची नाबाद खेळी केली तर शिवम दुबे 43 धावा करून नाबाद राहिला. धोनीला त्याच्या स्फोटक खेळीसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
In the arc and out of the park! ????#ShivamDube breaks the shackles and smashes the first six of the innings! More to come? ????
— Star Sports (@StarSportsIndia) April 14, 2025
Watch the LIVE action ➡ https://t.co/s4GGBvRcda#IPLonJioStar ???? #LSGvCSK | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi & JioHotstar! pic.twitter.com/g3GhxneYQD
The IMPACT player does it with MAX IMPACT ????
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2025
Shivam Dube ???? MS Dhoni with a match-winning partnership ????@ChennaiIPL are ???? to winning ways ????
Scorecard ▶ https://t.co/jHrifBlqQC #TATAIPL | #LSGvCSK pic.twitter.com/AI2hJkT9Dt






