भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला पंजाब किंग्जनं राईट टू मॅच कार्ड वापरून 18 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. सनरायझर्स हैदराबादनं अर्शदीपवर 15.75 कोटींची बोली लावली होती, पण पंजाबनं आरटीएम कार्ड वापरलं. राईट टू मॅच कार्डनंतर हैदराबादनं आपली बोली 18 कोटी रुपयांपर्यंत वाढवली, परंतु पंजाबनं तिही जुळवली आणि अर्शदीपला खरेदी केलं.
दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांनी अर्शदीप सिंगवर पहिल्यांदा बोली लावली होती. चेन्नईनं अर्शदीपवर जास्त पैसे लावले नाहीत. त्यांनी 7.25 कोटी रुपयांपर्यंत, तर दिल्लीनं 9.50 कोटी रुपयांपर्यंत प्रयत्न केले. येथून आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात स्पर्धा पाहायला मिळाली. परंतु रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनंही बोली 10.५ कोटींवर गेल्यानंतर आशा सोडली.राजस्थान रॉयल्सनं देखील प्रयत्न केला, त्यांची पहिली बोली 11 कोटी रुपये होती. परंतु राजस्थाननं 15.50 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यास नकार दिला.
सनरायझर्स हैदराबादनं अर्शदीपवर 15.75 कोटी रुपयांची बोली लावली होती, पण पंजाब किंग्जकडे राईट टू मॅच कार्ड होते. पंजाबनं आरटीएम कार्ड वापरण्यास सहमती दर्शवली, परंतु सनरायझर्स हैदराबादनं 18 कोटी रुपयांची पुढील बोली लावली. काही वेळ चर्चा केल्यानंतर, पंजाब किंग्जनं हैदराबादच्या बोलीशी जुळवून घेत 18 कोटी रुपयांमध्ये अर्शदीपचा आपल्या संघात समावेश केला.
याआधी पंजाब किंग्जनं शशांक सिंग आणि प्रभसिमरन सिंग यांच्या रूपानं केवळ 2 खेळाडू रिटेन केले होते. पंजाबकडे 110.5 कोटी रुपये शिल्लक होते. त्यातले 18 कोटी त्यांनी अर्शदीप सिंगवर खर्च केले.
हेही वाचा –
आता विजय आपलाच! यशस्वी-विराटच्या शतकानंतर सिराज-बुमराहचा कहर
विराट कोहलीचे शानदार शतक, सचिन तेंडूलकरचा महान विक्रम मोडीत, ऑस्ट्रेलिया भुईसपाट..!
विराट कोहलीचा जबरदस्त षटकार! सुरक्षा रक्षकाला लागला चेंडू; व्हायरल VIDEO पाहा





