आयपीएल 2025 पूर्वी होणाऱ्या मेगा ऑक्शनसाठी नियम जाहीर झाले आहेत. आता संघ 6 खेळाडूंना रिटेन करू शकतात. यामध्ये पाच कॅप्ड आणि एका अनकॅप्ड खेळाडूचा समावेश असेल.
यातला एक नियम फार खास आहे. संघ आता कॅप्ड खेळाडूंना देखील अनकॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन करू शकतात, मात्र यासाठी एक अट आहे. संघ त्याच कॅप्ड खेळाडूला अनकॅप्ड म्हणून रिटेन करू शकतो, ज्यानं गेल्या पाच वर्षांत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. रिटेन केलेल्या अनकॅप्ड खेळाडूंचं मूल्य 4 कोटी रुपयांपर्यंत असू शकतं. या यादीत काही दिग्गज भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. हे कोणते खेळाडू आहेत, ते आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगतो.
(1) महेंद्रसिंह धोनी – या लिस्टमधील पहिलं नाव अर्थातच महेंद्रसिंह धोनीचं आहे. खरं म्हणजे, हा नियम फक्त धोनी करताच लागू केला गेला असल्याचं बोललं जात आहे. सीएसकेच्या बोर्डानं आयपीएलच्या बैठकीत हा नियम लागू करण्याची मागणी केली होती, अशी बातमी आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही. चेन्नईची टीम धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन करणार का? याची पुष्टी अद्याप झालेली नाही.
(2) पीयूष चावला – या यादीतील दुसरं नाव आहे पीयुष चावलाचं. मुंबई इंडियन्स चावलाला अनकॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन करू शकते. भारताच्या 2011 विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या चावलानं त्याच वर्षी भारतासाठी शेवटचा एकदिवसीय आणि 2012 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. आयपीएलमध्ये मात्र त्याची कामगिरी शानदार राहिली आहे.
(3) संदीप शर्मा – संदीप शर्मा हा आणखी एक कॅप्ड खेळाडू आहे, ज्याला राजस्थान रॉयल्स अनकॅप्ड म्हणून रिटेन करू शकते. संदीपनं टीम इंडियासाठी केवळ 2 टी20 सामने खेळले. त्यानं 2015 मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केलं होतं. त्याच वर्षी त्यानं शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. संदीपचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये रेकॉर्ड चांगला आहे. याशिवाय त्यानं आयपीएलमध्येही उपयुक्त गोलंदाजी केली आहे. संदीपनं आयपीएलच्या 126 सामन्यात 137 विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा –
आयपीएल 2025 साठी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी कधी जाहीर होणार? तारीख जाणून घ्या
आता मनमानी चालणार नाही! ऑक्शननंतर ऐन वेळेवर माघार घेणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआयचा दणका
‘थाला’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! धोनीचा आयपीएल 2025 मध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा; खास नियम लागू