आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलावाचे आयोजन होणर आहे. आता या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यावेळी मेगा लिलाव नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केला जाऊ शकतो. अहवालानुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) लवकरच याबाबत अपडेट देण्याची शक्यता आहे. मेगा लिलावापूर्वी खेळाडूंची सुटका (रिलीज) आणि कायम ठेवण्याची (रिटेन्शन) यादीही जाहीर केली जाईल. यावेळी बीसीसीआय नवीन रिटेन्शन नियमही जारी करणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय मेगा लिलावाची तयारी करत आहे. जे की नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केले जाऊ शकते. नवीन रिटेन्शन नियमही या महिन्याच्या शेवटी जाहीर केले जाऊ शकते. आयपीएलचा पहिला मेगा लिलाव 2014 मध्ये झाला होता. तर दुसरा मेगा लिलाव 2018 मध्ये झाला. आत्तापर्यंत गेल्या 10 वर्षांत आयपीएलमध्ये फक्त दोनच मेगा लिलाव झाले आहेत. आता पुन्हा एकदा 2025 मध्ये मेगा लिललावाची तयारी सुरू आहे.
मेगा लिलाव कोठे आयोजित केला जाईल याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण ताज्या अहवालानुसार गेल्यावेळेप्रमाणेच या वेळीही परदेशात लिलाव आयोजित केला जाऊ शकतो. आयपीएल 2024 मधील लिलाव दुबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. तर 2023 मध्ये भारतातच लिलाव आयोजित करण्यात आले आहेत. मात्र यावेळी पुन्हा हा कार्यक्रम परदेशात आयोजित केला जाऊ शकतो.
IPL 2024 UPDATES: [Vijay Tagore from Cricbuzz]
– Auction likely to be in overseas
– Might be on the 3rd or 4th week of November
– Venue likely to be in middle East
– Deadline for teams to announce their retention is expected to be around November 15
– Retention rules might come… pic.twitter.com/b1wFHsCAyy— Johns. (@CricCrazyJohns) September 18, 2024
आययपीएल मेगा लिलावापूर्वी रिटेन्शन नियम जाहीर केले जातील. कोणता संघ किती खेळाडूंना कायम ठेवू शकेल यावर अवलंबून असेल. अशा परिस्थितीत अनेक मोठ्या खेळाडूंचे संघ बदलतील. रोहित शर्मा, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्याबाबत अनेक अफवा पसरल्या आहेत. गेल्या मोसमात मुंबईने रोहितला कर्णधारपदावरून हटवले होते. त्याच्या जागी हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. यामुळे रोहितचे चाहतेही संतापले होते. अश्या स्थितीत आगामी हंगामासाठी संघ काय निर्णय घेतील. हे पाहणे रंजक ठरणार आहे.
हेही वाचा-
AFG vs SA: अफगाणिस्तानचा मोठा उलटफेर, पहिल्याच सामन्यात आफ्रिकेला नमवले
IND vs BAN: “आम्ही विरोधकांचा विचार…” पहिल्या सामन्यापूर्वी बांगलादेश कर्णधाराचे खळबळजनक वक्तव्य
IND vs BAN: विराट-शाकिबमध्ये होणार जंगी लढत, जाणून घ्या सामन्यापूर्वी टॉप-5 खेळाडूंची लढाई