आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाचं आयोजन येत्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. सर्व फ्रॅन्चाईजींना 31 ऑक्टोबर पर्यंत आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची लिस्ट द्यायची आहे. जसजशी ही तारीख जवळ येत आहे, तसतशी यासंबंधी विविध बातम्यांना पेव फुटला आहे. अनेक मोठ्या खेळाडूंबाबत बातमी येत आहे की, ते आपल्या संघाची साथ सोडू शकतात. यापैकी एक नाव आहे दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत याचं. रिपोर्ट्सनुसार, दिल्ली कॅपिटल्सचा संघ रिषभ पंतला रिलिज करू शकतो. अशा परिस्थितीत दोन फ्रॅन्चाईजी त्याला आपल्या संघात शामील करून घेण्यास उत्सुक आहेत.
वास्तविक, दिल्ली कॅपिटल्सच्या मॅनेजमेंटमध्ये अनेक बदल झाले आहेत. सर्वात आधी मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर हेमांग बदानी यांना मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आलं. आता बातमी येत आहे की, मॅनेजमेंट रिषभ पंतला भविष्यात संघाचा कर्णधार म्हणून पाहत नाहीये. यामुळे पंत मेगा ऑक्शनमध्ये उतरू शकतो. या घटनाक्रमावर इतर संघांची नजर आहे. पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स पंतला आपल्या टीममध्ये शामील करून घेण्यास उत्सुक आहेत.
‘टाईम्स ऑफ इंडिया’नं आपल्या एका रिपोर्टमध्ये सांगितलं की, लखनऊ सुपर जायंट्स कर्णधार केएल राहुलला रिलिज करणार आहे. यामुळे संघाला एका कर्णधाराची आवश्यकता आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्ज देखील कर्णधाराच्या शोधात आहे. अशा परिस्थितीत हे दोन संघ रिषभ पंतच्या भूमिकेवर लक्ष ठेवून आहेत. जर पंत मेगा ऑक्शनमध्ये आला, तर लखनऊ आणि पंजाब त्याच्यावर मोठी रक्कम खर्च करू शकते. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा –
केएल राहुलच्या भविष्यावर टीम मॅनेजमेंटने निर्णय घेतला! गौतम गंभीरनं स्पष्टच सांगितलं
लखनऊच्या मॅनेजमेंटने कर्णधार केएल राहुलचा केला पत्ता कट, कारण ऐकून व्हाल थक्क..!
IND VS NZ; दुसऱ्या टेस्टपूर्वी शुबमन गिलचा नवा लूक समोर, पाहा व्हायरल फोटो